नेवासा – नगरछत्रपती संभाजीनगर महामार्गावरील नेवासा फाटा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत जालना येथील एका 33 वर्षाच्या युवकाचा जागीच मृत्यु झाल्याची दुर्देवी घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास हॉटेल नामगंगा समोर घडली. याबाबत अधिक सविस्तर वृत्त असे की, जालना येथील कोष्टी गल्लीत राहणाऱ्या विजय लक्ष्मण मोरे (वय ३३) या युवकाला नेवासा फाटा येथील नामगंगा हॉटेल समोर अज्ञात वाहनाने चिरडल्यामुळे त्याचा जागीच मृत्यु झाला.

मात्र मयत व्यक्ती नेमका कुठे आला होता? की, त्याचा कोणाशी वाद झाला होता की,? त्याला नेमके कोणत्या अज्ञात वाहनाने धडक दिली ? याचा थांगपत्ताही अद्याप पोलीसांना लागलेला नसून पोलीस हवालदार शहाजी आंधळे याबाबत अधिक तपास करत असून मयताचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी नेवासा फाटा ग्रामिण रुग्णालयात हलविण्यात आला आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.