नेवासा – नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र जुने टोका येथे सिद्धेश्वर मंदिर येथे महाशिवरात्री उत्साहात साजरी करण्यात आली.
गोदावरी-प्रवरा संगमाकाठी असलेल्या टोका येथील पुरातन सिद्धेश्वर शिवालयात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. मंदिरात दर्शनाला पहाटेपासूनच भाविकांनी’ रांगा लावल्या होत्या. यावर्षी गर्दीचा उच्चांक होता. पहाटेच्या दर्शनाला जास्त गर्दी दिसली. तसेच सिद्धेश्वर मंदिर जवळील महंत १००८ बालब्रह्मचारी महाराज समाधी मंदिर येथे हजारो भाविकांनी दर्शन घेतले. यावेळी श्री सिद्धेश्वर भगवान की जय… हर हर महादेव चा जयघोषाने परिसर दुमदुमला.

महाशिवरात्रीच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले तसेच अभिषेक, आरती, गंगापूजन, दीपदान आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. तसेच शिवलिंगाच्या मुख्य प्रवेशद्वारावर वेगवेगळ्या फुलांची आकर्षक सजावट देखील करण्यात आली होती. देशाच्या महाशिवरात्री निमित्त कानाकोपऱ्यामधून भाविक श्री सिद्धेश्वर मंदिरात दर्शनासाठी श्रीक्षेत्र टोका येथे दाखल झाले होते. यावेळी अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती. महाशिवरात्र यात्रेनिमित्त उत्सव कमिटी व पोलीस विभाग, होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. आज गुरुवार दि. २७ फेब्रुवारी रोजी काल्याच्या किर्तनाने या सोळ्याची सांगता होणार आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.