गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील मोरया चिंचोरे येथून डंपर व ट्रॅक्टर द्वारे मोठ्या प्रमाणात मुरमाची वाहतूक सुरू असून मात्र प्रशासनाचे तोंडावर बोट हाताची घडी असला प्रकार सुरू असून रात्रंदिवस येथून ट्रॅक्टर द्वारे डंपर द्वारे हजारो ब्रास गौण खनिजांची वाहतूक सुरू असताना महसूल प्रशासन करते तरी काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला असेल त्यामुळे सोनई मोरे चिंचोरे रस्त्याची पूरर्ती वाट लागली आहे. या रस्त्याचे डांबरीकरणाचे व रुंदीकरणाचे काम सध्या सुरू असून ठेकेदारांनी साईड पट्ट्याच्या उकरून त्यामध्ये खडी व मुरूम वापरून साईड पट्ट्या भरल्या मात्र ती खडी ती व्यवस्थित दाबली नसल्याने मुरूम वाहतूक करणारे ट्रॅक्टर व डंपर या रस्त्याने येत असल्याने आता ती खडी उकडून बाहेर आल्याने रस्त्यावर विखुरली गेली असल्याने या रस्त्याने चालणे सुद्धा कठीण झाले आहे.

या रस्त्याचे काम होईल की नाही अशी शंका उपस्थित केली जात आहे. कारण कित्येक दिवसापासून हे काम बंद असून ठेकेदार आपल्या मर्जीने हे काम करत असल्याचे दिसून येत आहे याबाबत ठेकेदार कंपनीशी संपर्क साधला असता निधी नसल्यामुळे सदरचे काम बंद आहे निधी आल्यानंतर काम सुरू करण्यात येणार आहे असे सांगितले मात्र साईड पट्ट्या व्यवस्थित दाबल्या नसल्याने आता खडी उघडी पडली असल्याने ती आता रस्त्यावर विखुरली गेल्याने या रस्त्याने दुचाकी चालवणे सुद्धा अवघड होऊन बसले आहे या रस्त्याने ट्रॅक्टर डंपर भरतीच्या उसाच्या बैलगाड्या शाळेला जाणारे विद्यार्थी विद्यार्थिनी यांची ये जा मोठ्या प्रमाणात असते मात्र या रस्त्याने दररोज ३० ते ४० ट्रॅक्टर द्वारे अवैद्य गौण खनिजाची वाहतूक कायदेशीर का बेकायदेशीर सुरू आहे याचा उलगडावर होत नाही.

तरी महसूल प्रशासनाने याचा खुलासा करणे आवश्यक आहे महसूल प्रशासनाच्या व पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने या गौण खनिजाचे वाहतूक सुरू असल्याचे उघडपणे बोलले जात आहे तरी यावर कारवाई होणे आवश्यक आहे अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करावे लागेल असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.