नेवासा : जिल्हा शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत नेवासा जिल्हा परिषद मुलींच्या शाळेने प्रथम क्रमांक मिळविला आहे.मोठ्या गटात गळनिंब(ता.नेवासा) जिल्हा परिषद शाळेने तृतीय क्रमांक मिळविला आहे.जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धेत घवघवीत यश प्राप्त केल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमात सुध्दा तालुक्याचा डंका वाजल्याने विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे. नेवासा जिल्हा परिषद मुलींच्या शाळेतील स्वरा शिंदे, ज्ञानेश्वरी दळवी,अन्विशा खाटीक,जान्हवी भगत,आराध्या गाढवे,वेदांती सावंत,गार्गी सोनवणे,ज्ञानदा पठाडे,ओवी बोरकर,माधवी व्यवहारे,कृष्णा गरुटे,आरोही आलवणे,प्रांजल काळे, गौरी मापारी व प्रांजल दहिफळे,ईश्वरी फाजगे,पूजा बेहळे यांनी संत गोरा कुभांर नाटिका सादर करुन त्यातून पर्यावरण, शिक्षण,जातीय सलोखा,आरोग्य व व्यसनमुक्तीवर समर्पक प्रबोधन केले होते.

विजयी संघास शिक्षिका मनीषा जवणे, मुख्याध्यापिका नंदा गवळी,सुधाकर झिने,शरद मचे, विजय साळुंके, मालनबाई कोळपकर, वैशाली कुलट, ज्योती बोरूडे,वर्षा जगताप यांचे मार्गदर्शन लाभले. गळनिंब जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘तिच्या जन्माची कहाणी’ नाटिकेस तृतीय क्रमांक मिळाला आहे. मुख्याध्यापक भारत गवळी,शिक्षक अंबादास शेळके,अशोक मोरे,दिपाली जाधव,शरद खरात,भानुदास घोडके व मोहिनीराज थोरात यांचे मार्गदर्शन लाभले.
विजेत्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी अशिष येरेकर, जिल्हा शिक्षणाधिकारी भास्कर पाटील,नेवासाचे गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड,केंद्रप्रमुख संजय शेळके यांनी अभिनंदन केले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.