नेवासा – नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथील दीनमित्र ग्रामीण वाचनालयाचे वतीने भेंडा खुर्द जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सुदंर मराठी हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आल्या.या स्पर्धेत १६३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. भेंडा बुद्रुक येथील दीनमित्र ग्रामीण वाचनालयाचे वतीने जेष्ठ कवी वि.वा शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा दि.२७ फेब्रुवारी हा जन्मदिवस “मराठी भाषा गौरव दिन” म्हणुन साजरा करणेत आला. त्याअनुषंगाने मराठी भाषेचा प्रचार व प्रसार, जतन व संवर्धन या धोरणाची व्यापकता वाढविण्यासाठी आमच्या दीनमित्र ग्रामीण वाचनालयाचे वतीने भेंडा खुर्द जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत
“सुंदर मराठी हस्ताक्षर स्पर्धा” घेण्याचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता पहिली ते चौथीच्या वर्गातील एकूण १६३ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला. कवी कुसुमाग्रज यांची “कणा” ही कविता व “भारत माझा देश आहे” ही प्रतिज्ञा हस्ताक्षर लिखाणाकरिता देण्यात आल्या होत्या. शिक्षिका मनीषा धनापुणे व संध्या मुंगसे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

स्पर्धेतील विजयी स्पर्धक असे…
इयत्ता पहिली:– चंद्रशेखर चंद्रकांत महापूर(प्रथम क्रमांक), नक्ष उमेश मंडाले
(द्वितीय क्रमांक), तन्वी शिवाजी धनवडे(तृतीय क्रमांक).
इयत्ता दुसरी:– स्वरा नागेश नवले (प्रथम क्रमांक), आदेश शिवाजी धनवडे (द्वितीय क्रमांक), सिद्धार्थ ज्ञानेश्वर धनवडे(तृतीय क्रमांक).

इयत्ता तिसरी:– शिवम गणेश शिंदे (प्रथम क्रमांक), कार्तिक सुनिल साळवे
(द्वितीय क्रमांक), संस्कृती सुरेश महापूर(तृतीय क्रमांक).
इयत्ता चौथी:– संग्राम किशोर पालवे (प्रथम क्रमांक), साक्षी सुनिल साळवे(द्वितीय क्रमांक), साक्षी रोहिदास नवले (तृतीय क्रमांक).
या विजेत्या स्पर्धाकांना मुख्याध्यापक
साहेबराव मले व वाचनालयाचे सचिव डॉ.रजनीकांत पुंड यांचे हस्ते प्रशस्तीपत्र व पेन बक्षीस म्हणून देण्यात आले.दीनमित्र वाचनालयाचे अध्यक्ष सुखदेव फुलारी, शिक्षक अशोक पंडित, रवींद्र डौले,शिक्षिका संध्या मुंगसे यावेळी उपस्थित होते.
शिक्षिका मनीषा धनापुणे यांनी प्रास्ताविक केले.अशोक पंडित यांनी आभार मानले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.