ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
रत्नमालाताई

नेवासा – एकात्मिक बाल विकास सेवा योजना सेवा योजना नेवासा यांच्यावतीने दिघी येथे बाल मेळावा संपन्न त्याप्रसंगी सौ.रत्नमालाताई विठ्ठलराव लंघे या बोलत होत्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दिघे गावचे सरपंच भाऊराव ब्राह्मणे हे होते.

तसेच मंचावरती सौ.रत्नमाला विठ्ठलराव लंघे, सि.डि.ओ पवार मॅडम, परवेक्षिका गायकवाड मॅडम, नजन मॅडम ,सावळे मॅडम, लोंढे मॅडम, पालवे मॅडम, तसेच ग्रामस्थ रामेश्वर निकम, आदिनाथ निकम, दिघी अंगणवाडी सेविका सौ.स्वाती कडूबाळ हिवाळे, शकुंतला चंद्रकांत निकम, सौ.मनीषा सुधीर भगत, मदतनीस सौ.अलका एकनाथ पेरे, अनिता राजू बर्वे, सलाबतपुर येथील माया जाजू, गोगलगाव येथील विमल वांडेकर, गिडेगाव सविता दिवाकर, गळलिंब हिवाळे प्रतिभा, गोंडेगाव अलका शेजुळ, तसेच सलाबतपुर गट व शिरसगाव गटातील सर्व अंगणवाडी का सेविका व मदतनीस या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होत्या.

रत्नमालाताई

यावेळी सौ.रत्नमाला विठ्ठलराव लंघे पाटील बोलताना म्हणाल्या की बालकांच्या बाल विकास व बुद्धी कौशल्य वाढवण्यासाठी अंगणवाडी सेविकांचा फार मोठा मोलाचा वाटा आहे आपण घरामध्ये एक बालक संभाळणे आपल्याला मुश्किल होते परंतु अंगणवाडी सेविका आपला पूर्णतः वेळ देऊन आपल्या बालकांची देखभाल करतात व त्यांना बालसंस्कार देतात व भविष्यकाळातील विद्यार्थी घडविण्याचे काम या सेविका करत असतात आणि हा बाल मेळावा त्यातलाच हा एक भाग आहे असे सौ रत्नमाला विठ्ठलराव लंघे बोलताना म्हणाल्या त्या दिघे येथील अंगणवाडी सेविका व बाल मेळाव्या प्रसंगी बोलत होत्या.

रत्नमालाताई

यावेळी बालकांचे प्रोत्साहन वाढवण्यासाठी आनंद नगरी बाजार भरवला गेला होता त्यामध्ये अनेक संसार उपयोगी वस्तूंचा देखावा तसेच जीवनामध्ये लागत असलेल्या अत्यावश्यक वस्तू फळे, भाजीपाला किराणा, आदी गृह उपयोगी वस्तूंचा स्टॉल लावण्यात आले होते तसेच लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम नृत्य आदी कार्यक्रम व विद्यार्थ्यांना त्याची माहिती शिक्षकांच्या वतीने देण्यात येत होती यामध्ये सर्व अंगणवाडी सेविकांनी बहुमोल परिश्रम घेतले तसेच पालक वर्ग दिघी गावातील ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‌

newasa news online
रत्नमालाताई

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

रत्नमालाताई
रत्नमालाताई

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

रत्नमालाताई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!