नेवासा – श्री संगमेश्वर महादेव टेकडी देवस्थान ट्रस्ट वडुले बुद्रुक येथे अंखड हरिनाम सप्ताह व काल्याचे किर्तन निमित्ताने श्री ज्ञानेश्वर महाराज सबलस वडुलेकर यांचे कीर्तन झाले आणि अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली ,भाविक भक्त मोठ्या प्रमाणात काल्याच्या कीर्तनासाठी व महाप्रसाद घेण्यासाठी देवस्थान वर आले होते. काल्याची व महाप्रसादाची पंगत श्री नवनाथ गोविंदराव निकाळजे यांचे वतीने सर्व भाविक भक्तांना देण्यात आली. वडुले बुद्रुक सह तालुक्यातील खेड्यापाड्यातून भक्तांनी संगमेश्वराचे दर्शन घेतले व सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

दरवर्षी होत असलेल्या सप्ताहासाठी जे अन्नदाते आहे त्यांचा अस्तित्व सहकारी पतसंस्थेच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन व संगमेश्वर देवाची फोटो फ्रेम देऊन सन्मान करण्यात आला . यावेळी अस्तित्व सहकारी पतसंस्था बँकेचे चेअरमन महेंद्र शिरसागर ,व्हाईस चेअरमन गणेश जाधव, पतसंस्थेचे सचिव श्री जनार्दन रायकर हे उपस्थित होते.या धार्मिक कार्यास अस्तित्व सहकारी पतसंस्था , संगमेश्वर विकास समितिचे सदस्य, संगमेश्वर देवस्थान पंचकमिटी, भजणी मंडळ या सर्वांचे कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले. त्या बाबत सर्वाचे संगमेश्वर देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा मनीषा अमोल बुचकुल यांनी आभार मानले.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.