रोजलँड इंटरनॅशनल स्कूल मध्ये विज्ञान आणि गणित प्रदर्शन उत्साहात
नेवासा – नेवासा फाटा येथील नामांकित सी. बी . एस.ई. पॅटर्न रोजलँड इंटरनॅशनल स्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या पार्श्वभूमीवर विज्ञान आणि गणित प्रदर्शन उत्साहात संपन्न झाले. प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी विज्ञान , गणित आणि ए. आय या विषयावर विविध स्वयंचलित उपकरणे सादर केले. मुख्य आकर्षण म्हणजे उद्घाटनावेळी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करणे आणि फीत कापण्यासाठी कातर देणे हे काम इयत्ता इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या स्वयंचलित यंत्रमानवाच्या हाताने करण्यात आले . ए.आय. प्रणाली द्वारे संचलित यंत्रमानवाने सर्वांचे लक्ष वेधले.

तसेच या प्रदर्शनामध्ये इयत्ता पहिली ते नववी या वर्गांचे सर्व विद्यार्थी सहभागी झाले. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी हवेचा दाब, सौर उर्जेवर चालणारा यंत्रमानव, पूर नियंत्रक यंत्र ,गणितीय सूत्र यंत्र, सौर उर्जेवर चालणारे वेल्डिंग मशीन, विविध भौमितिक कोन आणि त्यांचे वैशिष्ट्य सांगणारे यंत्र तसेच संगणकाचे विविध भाग आणि त्यांचे कार्य या विषयावर स्वयंचलित प्रकल्प तयार करून सादर केले .तसेच सर्वांनी आपापल्या प्रगत प्रकल्पाविषयी मुद्देसूद माहिती देखील सांगितली.

यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री भाऊसाहेब पाटील अंबाडे , श्री.प्रमोद शिंदे,संचालिका सौ .निकिता दीपक अंबाडे, प्राचार्य श्री.सुनीलकुमार जैन व उपप्राचार्य श्री पंडितराव खाटीक उपस्थित होते. प्रदर्शनाचे उद्घाटन पालक सौ कविता नेहे यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच यावेळी बोलताना संचालिका सौ.निकिता अंबाडे म्हणाल्या की, अशा प्रकारचे प्रदर्शन काळाची गरज असून याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.