नेवासा : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत जाहीर सभेत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेसचे नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांना नाशिक कोर्टात हजर राहावे लागणार आहे. सन २०२२ –मध्ये दाखल झालेल्या याचिकेच्या-कामकाजात खा. गांधी गैरहजर आहेत. वारंवार वॉरंट बजावूनही ते गैरहजर राहत असल्याने त्यांना ७ मे रोजी होणाऱ्या सुनावणीस हजर राहण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. हिंगोली येथे झालेल्या तत्कालीन जाहीर सभेत राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या विधानावरून सन २०२२ मध्ये निर्भय फाऊंडेशनचे अध्यक्ष देवेंद्र भूतडा यांनी नाशिक जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

त्यावर नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी सुरू असून ऑक्टोबर २०२४ पासून गांधी यांना न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहण्याचे वेळोवेळी समन्स बजावण्यात आले आहेत. त्यानुसार, १ मार्च रोजीदेखील गांधी यांनी न्यायालयात हजर राहणे अपेक्षित होते. परंतु गांधी गैरहजर राहिले व त्याबाबत गांधी यांच्या वकिलांनी अर्ज दाखल केला. नव्हता मात्र पुढे हजेरीसाठी कायमस्वरूपी उपस्थित न राहण्यासंदर्भात त्यांनी अर्ज दाखल केल्याचे कळते. त्यावर भूतडा यांचे वकील मनोज पिंगळे यांनी युक्तिवाद केल्याने न्यायालयाने राहुल गांधी यांना ७ मे रोजी नाशिक न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.