नेवासा – नेवासा मधील युवानेते तसेच सामाजिक कार्यात कायम पुढे असणारे आंतरराष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे तालुकाध्यक्ष स्वप्नील मापारी यांनी अतिक्रमण संदर्भात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना पत्र पाठवून नेवासकारांच्या अतिक्रमण संदर्भात व्यथा मांडली आहे.या पत्रात असे म्हणले आहे की नेवासा शहरात साधारण एक महिन्यापासुन अतिक्रमणाचे सावट चालु आहे. शहरातील अतिक्रमण धारकांना नगरपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या मार्फत नोटिस दिल्या गेल्या आहे. तरी आम्ही या आधीही नेवासा नगरपंचायत कार्यालयास पत्र दिले आहे, की या अतिक्रमण धारकांचे कुठेतरी पुर्नवसन करा किंवा यांना व्यापारी संकुल बांधुन प्रथम प्राधान्य दयावे, तरी हया कोणत्याही बाबीचा विचार न करता या अतिक्रमणधारकांना पुन्हा नोटीस देण्यात आल्या आहे.

तरी मा. मुख्यमंत्री साहेब नेवासा शहरात जे शॉपिंग कॉम्प्लेक्स झाले ते अजुन चालु झाले नाही व त्या व्यापा-यांना लेखी देऊनही गाळे देण्यात आले नाही. तरी पुन्हा नोटीस दिल्यांने शहरातील नागरिक भयभित झाले असुन अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. तरी मा. मुख्यमंत्री साहेब आपल्याला एक आदर्श मुख्यमंत्री म्हणुन पाहिले जाते तसेच आपणांस राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखले जाते तर आपण आपला चाणक्यपणा इथेही दाखवून असा उपाय करावा कि अतिक्रमणही निघेल विकास पण होईल व महत्वाचे म्हणजे लोकांचे पुर्नवसन होऊन त्यांची उपजिविका ही भागेल,.

तरी मा. महोदय ज्या ठिकाणी खरंच अतिक्रमण मध्ये येतील ते विकास कामासाठी जरुर काढाव्या पण इथे कोणत्याही प्रकारचे काहीही ड्रीम प्रोजक्ट नाही आहे किंवा कोणताही व्यापारी संकुल किंवा रस्त्यासाठी निधी नाही आहे, मग हे अतिक्रमण का काढले जात आहे व का लोकांवर उपासमारीची वेळ येत आहे. तरी मा. महोदय हे अतिक्रमण काही ड्रीम प्रोजेक्ट नसेल तर अतिक्रमण काढु नये व काढलेच तर मुख्य रोडला १२ मीटर करावे. तसेच अंतर्गत रस्ते आताच काही दिवसापुर्वी
झाले असुन ते मोठेच आहे. त्यांमुळे अंतर्गत अतिक्रमण काढायची कोणत्याही प्रकारची गरज नाही तरी अंतर्गत अतिक्रमण काढु नये व मुख्य रस्त्यावरचे १२ मीटरच काढावे किंवा आधी अतिक्रमण धारकांचे पुनर्वसन करावे ही विनंती.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.