नेवासा – बेलपिंपळगाव गण आभार दौऱ्या निमित्त काल संध्याकाळी नेवासा तालुक्याचे लोकप्रिय आमदार यांनी गोधेगाव येथे श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा जन्मभूमी मंदिर येथे नेवासा तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय श्री विठ्ठल राव लंघे पाटील यांचे ग्रामस्थांच्या वतीने भव्य मिरवणूक काढून व जेसी पी ने त्यांच्यावर फुलाची उधळण करून जंगी स्वागत केले. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती नेवासा भारतीय जनता पार्टीचे युवा नेते ऋषिकेश भाऊ शेटे, राजेंद्र मते, डॉ. ढगे नवनाथ साळुंखे देवगडचे सरपंच अजय साबळे युवा सेना प्रमुख शुभम उगले, आदिनाथ पटारे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाप्रसंगी भालगाव व गोधेगाव ग्रामस्थांच्या वतीने विद्यमान आमदारांचा व पदाधिकारी कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला

याप्रसंगी बोलताना ग्रामस्थांच्या वतीने नवनाथ पठाडे व मा. सरपंच राजेंद्र गोलांडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर युवा नेते ऋषिकेश शेटे आपल्या मनोगत बोलताना सांगितले की बेलपिंपळगाव गट तसा जायकवाडी बॅकवॉटर चा पट्टा असल्यामुळे सर्व सधन व प्रगतीचे शेतकरी आहे आता कोणाच्याही दबावाला घाबरायची आपल्याला गरज नाही असंख्य साखर कारखाने झाल्यामुळे पुढील वर्षी कारखानदार आपल्या दारात येतील त्यामुळे सर्वांनीआमदार विठ्ठलभाऊ लंघे यांच्या विकासाच्या गंगेमध्ये सहभागी होण्याचे सर्वांना आवाहन केले आणि आपल्यासाठी आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कुठल्याही प्रसंगी आपल्या सुखदुःखात तत्पर हजर राहू व आपल्या परिसराचा विकास पुढील पाच वर्षाच्या कालावधीत करण्याचा प्रयत्न करूअसे यावेळी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.

त्यानंतर तालुक्याचे लोकप्रिय आमदार विठ्ठलराव लंघे यांनी बोलताना परिसरातील जनतेने मतदान रुपी भरभरून आशीर्वाद दिल्याबद्दल सर्व जनतेचे आभार मानले व विकास कामा च्या माध्यमातून आपल्या रुणातून मुक्त होण्यासाठी मी कायम सोबत राहून प्रयत्नशील राहील अशी ग्वाही दिली कार्यक्रमादरम्यान स्वर्गीय वकिलअण्णांच्या जास्तीची दिलेले जुनी आठवण विळा ओम्बी पक्षाचे कार्ड तेथील ज्येष्ठ नागरिकांनी भाऊंना अण्णांची आठवण दाखवली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रगतिशील शेतकरी नवनाथ पठाडे यांनी केले. याप्रसंगी भालगाव येथील ग्रामस्थ अनिल राशिनकर ,सतीश तनपुरे गणेश भाऊ भागवत ,दगडू पाटील तनपुरे गोरख राशिनकर व गोधेगाव येथील ग्रामस्थ व महायुतीचे पदाधिकारी यावेळी युवा नेते रामेश्वर गाडेकर,

संपत उंबरकर, रामनाथ दुशिंग अभिषेक गोलांडे ,ऋषिकेश गाडेकर, करण पल्लारे ,नवनाथ गाडेकर, भीमराज जाधव अशोक कर्डिले ,संजय दुशिंग, रूपचंद पल्लारे ,शुभम पठाडे, माजी सरपंच राजेंद्र गोलांडे, अमोल जाधव यांच्या वतीने लोकप्रिय आमदार विठ्ठलराव लंघे पाटील व युवा नेते ऋषिकेश भाऊ शेटे भव्य सत्कार करण्यात आला त्यानंतर आभार मेळावा व उत्साहात पार पडला त्यानंतर गोधेगाव जन्मभूमी येथील विठ्ठलराव लंघे मित्र मंडळाच्या वतीने सर्वांना स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.