नेवासा- शहरातील अतिक्रमण कारवाईच्या निषेधार्थ प्रशासनाची व सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढल्याने व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत भरत भीमराज बोडखे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की ,शासनाच्या निर्देशानुसार नेवासा शहरामध्ये दिनांक 03.03.2025 व दिनांक 04.03.2025 रोजी नेवासा खुर्द ते श्रीरामपुर या रस्त्याच्या मार्गावरील 15 मीटर अंतरावर असलेले सर्व अतिक्रमण काढण्यात आले आहे. त्याकरीता पोलीस स्टेशन नेवासा जावक क्रमांक 1086/2025 व 1098/2025 अन्वये लेखी बंदोबस्त आदेश काढण्यात आला होता.

आज अतिक्रमण काढण्याची कारवाई संपल्यानंतर संजय सुखधान रा. नेवासा यांच्या नेतृत्वाखाली नेवासा खुर्द शहरातील व्यापारी हे प्रशासन व सरकारचा निषेध करुन नेवासा शहरामध्ये प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात येणार असलेबाबत पोलीस निरीक्षक धनंजय जाधव पोलीस स्टेशन नेवासा यांना गोपनीय रित्या माहिती मिळाली होती त्यानुसार मा. पोलीस निरीक्षक यांनी मला सोबत सपोनि अमोल पवार, पोकों/अरविंद वैद्य, पोकों/सुमित करंजकर व पोकों/श्रीनाथ गवळी असे आम्हाला सर्वांना पोलीस निरीक्षक यांचे कक्षामध्ये बोलावुन वरीलप्रमाणे माहिती दिली त्यानुसार आम्ही मा. पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे मा. जिल्हादंडाधिकारी अहिल्यानगर यांचे जमावबंदी आदेश क्रमांक डिसी / कार्या / 941 / 439 / 2025 दिनांक 25.02.2025 अन्वये आदेश लागू आहेत

याबाबतच्या सुचना नेवासा खुर्द शहरामध्ये शासकीय वाहनाने फिरुन शासकीय वाहनाच्या माईकमध्ये देण्यात याव्यात अशा सुचना दिल्या त्यानुसार आम्ही वरील सर्वजण शासकीय वाहनाने नेवासा खुर्द शहरामध्ये पोलीस स्टेशन नेवासा स्टेशन डायरी क्रमांक 49/2025 वेळ 19.39 अन्वये रवाना झालोत त्यानुसार सपोनि अमोल पवार यांनी नेवासा खुर्द शहरातील गणपती चौक, बस स्टैंड परिसर व नगरपंचायत चौक या परिसरामध्ये मा. जिल्हादंडाधिकारी यांचे जमावबंदीचे आदेश लागु आहेत याबाबत सुचना दिल्या त्याबाबतचा मोबाईल मध्ये व्हिडीओ सुध्दा करण्यात आलेला आहे.
त्यानंतर सदर आदेशाच्या जाहीरपणे सुचना सांगुनही नेवासा खुर्द शहरातील 01) संजय सुखदान, 02) महेश मापारी, 03) सुलेमान मनियार, 04) अल्ताफ पठाण, 05) स्वप्नील राजेंद्र मापारी, 06) रुपेश उपाध्ये, 07) साजीद बागवान, 08) रियाझ शेख, 09) गणेश कोरेकर, 10) सलिम छोटु शेख, 11) ईरफान बनेमिया शेख, 12) रिझवान शेख, 13) योगेश गायकवाड व ईतर 20 ते 25 जणांनी मिळुन नेवासा खुर्द शहरातील काढण्यात आलेले अतिक्रमाणाच्या विरोधात मा.शासन व प्रशासनाची स्वर्गरथ क्रमांक MH 20 AT 6268 यावर पुठ्ठयाचा बोर्ड लावुन पुढे करुन प्रतिकात्मक अंत्ययात्रा पंचायत समिती नेवासा खुद पासुन ते नगरपंचायत चौकापर्यंत काढण्यात आली त्यानंतर सपोनि अमोल पवार व पोलीस स्टाफ यांनी सदर प्रतिकात्मक प्रेत यात्रा ही गैर कायदेशीर आहे असे जमलेल्या जमावाला सांगितले त्यावेळी त्यांनी सदरची प्रतिकात्मक प्रेत यात्रा थांबवुन जागीच शासनाचा निषेध करुन जमाव आप आपल्या ठिकाणी निघुन गेलेला आहे. याबाबतच्या व्हिडीओ माझ्यासह ईतरांनी मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले आहेत

तरी मा. जिल्हादंडाधिकारी यांचे जमावबंदीचे आदेश लागु आहेत याबाबतच्या सुचनांबाबत जाहीरपणे निर्देश देवुनही दिनांक 04.03.2025 रोजी 20.00 वाजण्याच्या सुमारास नेवासा खुर्द शहरातील 01) संजय सुखदान, 02) महेश मापारी, 03) सुलेमान मनियार, 04) अल्ताफ पठाण, 05) स्वप्नील राजेंद्र मापारी, 06) रुपेश उपाध्ये, 07) साजीद बागवान, 08) रियाझ शेख, 09) गणेश कोरेकर, 10) सलिम छोटु शेख, 11) ईरफान बनेमिया शेख, 12) रिझवान शेख, 13) योगेश गायकवाड व ईतर 20 ते 25 जणांनी मिळुन नेवासा खुर्द शहरातील काढण्यात आलेले अतिक्रमाणाच्या विरोधात शासनाची स्वर्गरथ पुढे करुन प्रतिकात्मक अंत्ययात्रा पंचायत समिती नेवासा खुद पासुन ते नगरपंचायत चौकापर्यंत काढली म्हणुन माझी सदर ईसमांविरुध्द भारतीय न्याय संहिता कलम 189(2) सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1) (3), 135 प्रमाणे सरकारतर्फे कायदेशीर फिर्याद आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.