नेवासा – रस्ते अपघातांमधील जखमींना चालू महिन्यापासूनच दीड लाख रुपयांपर्यंतचा मोफत उपचार मिळणार आहे. हा नियम खासगी रुग्णालयांसाठी देखील अनिवार्य असेल. देशभरात ही व्यवस्था लागू केली जाणार आहे.एनएचएआय याकरिता नोडल एजन्सीचे काम करणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) अधिकाऱ्यांनुसार योजनेसाठी मोटर वाहन अधिनियम १९८ च्या कलम १६२ मध्ये पूर्वीच दुरुस्ती करण्यात आली आहे. ही योजना पूर्णपणे लागू करण्यापूर्वी मागील ५ महिन्यांमध्ये पाँडेचेरी, आसाम, हरियाणा आणि पंजाब सह ६ राज्यांमध्ये प्रायोगिक स्तरावर प्रकल्प राबविण्यात आला जो यशस्वी ठरला आहे.

जखमींना पोलीस किंवा नागरिकांनी रुग्णालयात पोहोचविताच त्वरित उपचार सुरू होणार आहे: याकरिता कुठलेही शुल्क जमा करावे लागणार नाही. तसेच जखमींसोबत कुटुंबीय असो किंवा नसो रुग्णालय त्यांची देखभाल करेल. ७ जानेवारी २०२५ रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ही योजना देशभरात लागू करण्याची अधिकृत घोषणा केली होती. यामुळे देशात कुठेही रस्ते अपघात झाल्यास जखमी इसमाला उपचारासाठी भारत सरकारकडून कमाल १.५ लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. याच्या माध्यमातून तो ७दिवसांपर्यंत रुग्णालयात उपचार करवून घेऊ शकणार आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.