नेवासा – नेवासा शहरातील ज्ञानेश्वर महाविद्यालय परिसर आणि नेवासा फाटा येथील साईसीटी वसाहतीसमोर चोरट्यांनी चार – पाच दिवसांपुर्वी चोरीच्या केलेल्या अयशस्वी प्रयत्नांची गंभीर दखल नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक धनंजय जाधव यांनी घेतली असून चोरटे हे सीसीटीव्ही कँमेऱ्यात कैद झाल्यामुळे लवकरच छायाचिञणाच्या आधारे गजाआड करण्यात येतील अशी माहीती दस्तुरखुद्द नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक धनंजय जाधव यांनी प्रस्तृत प्रतिनिधीं’शी संवाद साधतांना दिली.

नेवासा शहर व नेवासा फाटा परिसरात गेल्या चार – पाच दिवसांपुर्वी काही हत्यारबंद चोरट्यांनी या परिसरात मोठा धुमाकूळ घालत काही बंगल्यांच्या प्रवेशव्दाराची मोडतोड करुन तसेच काही ठिकाणी चोरट्यांनी थेट काही बंगल्यात आतमध्ये प्रवेश करुन घरातील सामानाची उचकापाचक केल्याची घटना घडलेली होती त्यामुळे या चोरट्यांकडून चोरीचा प्रयत्न केला गेलेला असला तरी हे चोरटे माञ सीसीटीव्ही कँमेऱ्यात कैद झाल्यामुळे या छायाचिञणाच्या आधारे नेवासा पोलीसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून या चोरट्यांचा तपास युद्ध पातळीवर तपास सुरु केलेला असून चोरटे हे लवकरच जेरबंद केले जातील असा विश्वासही यावेळी बोलतांना नेवासा पोलीस निरिक्षक धनंजय जाधव यांनी व्यक्त केला.

नेवासा पोलीसांनी या चोरट्यांना लवकरच जेरबंद करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केलेले असून या चोरट्यांचे धागेदोरे नेवासा पोलीसांच्या हाती लागलेले असल्याची माहीतीही त्यांनी दिलेली असून लवकरच हे चोरटे जेरबंद केले जातील ? असा विश्वासही यावेळी बोलतांना पोलीस निरिक्षक धनंजय जाधव यांनी व्यक्त केला आहे तसेच नागरीकांनी राञीच्या वेळी घरासमोरील विद्युत दिवा चालू ठेवून काही शंका भासल्यास तातडीने नेवासा पोलीसांशी संपर्क साधण्याचे आवाहन नेवासा पोलीस ठाण्याचे निरिक्षक धनजंय जाधव यांनी केले आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.