ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
शेत

नेवासा – राज्यात दिवसेंदिवस शेतरस्त्यांच्या अति जटिल प्रश्नामुळे शेतजमीन पडीक पडत असुन अनेक शेतकरी फौजदारी स्वरूपांच्या घटनांमध्ये अडकत असुन वर्षानुवर्ष नव्हे तर पिढ्यानपिढ्या शेतकऱ्यांचा प्रशासकीय न्यायालयीन संघर्ष सुरूच आहे. शासन निर्णय बनतात त्याची अंमलबजावणी प्रत्यक्ष मात्र होताना दिसत नाही. राज्य महामार्गा एवढेच शेतरस्त्यांना महत्व असुन शेतरस्ता हा शेतीचा श्वास असुन समृद्ध शेतकरी बनला तर समृद्ध महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण करता येईल.शेतकऱ्याचा मुख्य व्यवसाय शेती असल्यामुळे तो शेती बरोबर शेतीपुरक व्यवसायांसाठी शेतात वास्तव्यास राहत आहे.

शेत

शेतीसाठी आधुनिक यंत्रसामुग्रीच्या दळणवळणाची अत्यंत आवश्यकता निर्माण झाली असुन तुकडेवारी,भाऊ भावातील हिस्सेदारी, वाटप पत्रानंतर शेतरस्त्यांचा प्रश्न गंभिर बनत चालला असुन यासाठी ब्रिटिशकालिन शिव रस्ते व शिव पानंद शेतरस्त्यांना तातडीने खुले करून हद्द निश्चिती करण्यासाठी शिव पानंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते श्री शरदराव पवळे व राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांनी आज सोमवार 3 मार्च 2025 रोजी नुकतेच मान.डॉ.सुहास दिवसे,जमाबंदी आयुक्त तथा संचालक भुमिअभिलेख महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडे शिव रस्ते व शिव पानंद शेत रस्त्यांना नंबरी लावून त्यांचे विशिष्ट कालावधी (मुदतीत) सातत्याने सर्वेक्षण सुरू करून नंबरी हटवणारांना दंड सुरू करावा,पालकमंत्री शेत/पाणंद रस्ते योजनेसह इतर शासनिर्णयात निशुल्क मोजणी असताना तालुका भुमिअभिलेखने आकारलेले सर्व शुल्क व्याजासह शेतकऱ्यांना मागे परत द्यावे,

शेत

अतिक्रमित शासकीय शिव पानंद शेतरस्त्यांची कोणीही तक्रार दाखल केल्यास तातडीने त्यावर कार्यवाही करावी,शासकीय अधिकाऱ्यांनीच शासकीय शेतरस्ता केसेस चालवाव्यात,शासकीय शिव पानंद शेतरस्त्यांच्या हद्द निश्चितीनंतर अपिलाचा अधिकार नसावा,राज्यातील सर्व शिव पानंद शेतरस्त्यांच्या अतितातडीच्या मोजण्या विहीत कालावधीत (मुदतीत) पुर्ण करावेत , गावनकाशावरील सर्व बंद शेतरस्त्यांचा अहवाल घेवून तातडीने तालुका प्रशासनाला बंद रस्ते चालु करण्याचे आदेश द्यावेत त्याचबरोबर गाव नकाशावरील शेतरस्त्यांच्या लांबी रुंदी नकाशावर नमुद करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली.

हे निवेदन स्वीकारल्यानंतर या निवेदनावर डॉक्टर सुहास दिवसे साहेब यांनी राज्यात लवकरच गाव नकाशावरील शिव रस्ते व शिव पानंद शेत रस्ते चे हद्दी खुणा सरसकट निश्चित करण्यात येतील असे आश्वासन दिले.
{ सदर मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास पुढची नियोजीत दिशा लवकरच चळवळीच्या वतीने ठरवण्यात येईल} असे महाराष्ट्र राज्य शिव पानंद शेतरस्ता चळवळीचे शरद पवळे दादासाहेब जंगले पाटील यांनी प्रसारमाध्यमांना बोलताना सांगितले. अशी माहिती महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री नाथाभाऊ शिंदे यांनी दिली

शेत
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शेत
शेत

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!