नेवासा – जगद्गुरू संत श्री तुकोबारायांच्या सदेह वैकुंठगमन बीज उत्सवाच्या निमित्ताने नेवासा येथील संत श्री तुकाराम महाराज मंदिरामध्ये गुरुवर्य श्री उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार दि.९ मार्चपासून अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण व की र्तन सोहळा संपन्न होत आहे. या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांसह कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री संत गंगागिरी महाराज, ब्रम्हलीन गुरुवर्य नारायणगिरी महाराज, वै. बन्सी महाराज तांबे, वै. गुरुवर्य एकनाथ स्वामी महाराज, महंत भास्करगिरी महाराज यांच्या कृपाशिर्वादाने व उध्दव महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अंकुश महाराज जगताप व नेवासा ग्रामस्थांच्या सहकार्याने हा सोहळा होत आहे.

आठ दिवस चालणाऱ्या या सोहळ्यामध्ये पहाटे ४.३० ते ६ काकडा भजन, सकाळी ६.३० ते ७ विष्णू सहस्त्रनाम, सकाळी ७ ते ११.३० गाथा पारायण, दुपारी १२ वाजता भोजन प्रसाद, सांयकाळी ५.३० ते ६.३० हरिपाठ, सायंकाळी ७ ते ८ भोजन प्रसाद, रात्री ८ ते १० कीर्तन असे दैनंदिन कार्यक्रम होणार आहेत. रात्री ८ ते १० यावेळेत होणाऱ्या कीर्तन महोत्सवामध्ये दि.९ मार्च रोजी ज्ञानेश्वर महाराज इंगळे, दि.१० मार्च रोजी सुभाष महाराज जगताप, दि.११ मार्च रोजी शिवप्रसाद महाराज पंडित, दि.१२ मार्च रोजी आदिनाथ महाराज दुशिंग, दि.१३ मार्च रोजी महंत गणेशानंद महाराज, दि.१४ मार्च रोजी सोमनाथ महाराज कराळे, दि.१५ मार्च रोजी भागवताचार्य अंकुश महाराज जगताप यांची कीर्तनसेवा होणार आहे.

रविवारी दि.१६ मार्च रोजी सकाळी १० ते १२ यावेळेत जगदगुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या सदेह वैकुंठगमन निमित्ताने संत तुकाराम महाराज मंदिराचे प्रमुख गुरुवर्य श्री उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या काल्याच्या किर्तनाने अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याची सांगता होणार आहे. बीजेनिमित्ताने होणाऱ्या किर्तनाचा व गाथा पारायणाचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभघ्यावा, असे आवाहन संत तुकाराम महाराज भक्त मंडळ व नेवासा ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.