नेवासा तालुका प्रहार जनशक्ती युवक अध्यक्षपदी शेळके यांची निवड!
नेवासा – प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेवासा तालुका युवक कार्याध्यक्षपदी गळनिंब (ता.नेवासा) येथील सामाजिक कार्यकर्ते रामदास शेळके – पाटील यांची निवड करण्यात आली. प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार बच्चुभाऊ कडू यांचे विचार महाराष्ट्रासाठी अत्यावश्यक असून जात धर्म आणि पंथ यामध्ये समाज विखुरला गेलेला असतांना तिरंगा ध्वज हा सर्वश्रेष्ठ मानून विचारांची लढाई लढणारे माजी आमदार बच्चूभाऊ कडू हेच असल्याचे प्रतिपादन प्रहार जनशक्ती पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष विधीज्ञ पांडुरंग औताडे यांनी शेळके यांची निवड केल्याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात बोलतांना केले.

यावेळी बोलतांना ते म्हणाले की,प्रहारच्या विचारांवर काम करणारी सवंगडी पक्षाला मिळतात हेच आपल्या लढायचे खरे यश असल्याचेही यावेळी बोलतांना स्पष्ट केले. यावेळी प्रहारचे गळनिंब येथील सरपंच बाळासाहेब खर्जुले,संदीप,अरविंद आरगडे,भेंडा येथील माजी सरपंच संतोष मिसाळ,किरण शेळके, कल्याण शेळके,संतोष शेळके,शाखाध्यक्ष कृष्णा पाटील शेळके व परिसरातील नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.