नेवासे येथील अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संचलित ज्ञानोदय इंग्लिश स्कूल मध्ये शनिवार दि.८ मार्च रोजी ‘जागतिक महिला दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने ज्ञानोदय इंग्लिश स्कूल,कै.सौ. सुंदरबाई गांधी कन्या विद्यालय, ज्ञानोदय इंग्लिश मीडियम स्कूल मधील विद्यार्थिनी व अध्यापिकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मंचावर प्राचार्य रावसाहेब चौधरी, पर्यवेक्षक बाळासाहेब पवार, पर्यवेक्षिका सुनिता दिघे उपस्थित होत्या.
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी विद्यालयातील शिक्षक संदीप ढेरे यांनी काव्यवाचन केले. रोशन सरोदे यांनी घेतलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेला प्रतिसाद देत विद्यार्थ्यांनी प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली. निकिता गाढे व ओंकार वाघ यांनी मनोगत व्यक्त केले.

पर्यवेक्षिका सुनीता दिघे यांनी इतिहासातील गार्गी व मैत्रेयी या विद्वान महिलांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवावा असे प्रतिपादन केले. पर्यवेक्षक बाळासाहेब पवार यांनी समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांच्या बाबतीत आपल्या मनात आदरभाव असावा, असे सांगितले. प्राचार्य रावसाहेब चौधरी यांनी उपस्थित सर्व विद्यार्थिनी व अध्यापिकांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन समाजात वावरत असताना कोणत्याही महिलांवर अन्याय होणार नाही, याची आपण काळजी घेतली पाहिजे, याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय आखाडे यांनी केले तर वंदना गिजरे यांनी आभार मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किरण धाडगे, राजेंद्र चारुडे, सूर्यकांत बर्डे यांनी परिश्रम घेतले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.