ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
महिला दिन

सर्व विद्यार्थिनींनी आत्मनिर्भर होऊन शिक्षण क्षेत्रात मोठी प्रगती करावी – डॉ. सौ. रंजनाताई बेल्हेकर

नेवासा | नाथाभाऊ शिंदे – नेवासा तालुक्यातील भानसहिवरा येथील सुलोचना बेल्हेकर सामाजिक व बहुउद्देशीय शिक्षण संस्था म्हणजेच बेल्हेकर इन्स्टिट्यूट मध्ये नुकताच दिनांक 8 मार्च 2025 रोजी जागतिक महिला दिन मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रमाता जिजाऊ मांसाहेब , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला संस्थेचे उपाध्यक्ष व संचालिका डॉक्टर सौ रंजनाताई बेल्हेकर व नीलिमा निचीत ताई व श्री संजय कुमार निचित व स्वाती वाघे मॅडम यांनी पुष्पहार घालून व दीप प्रज्वलन करून महिला दिनाच्या कार्यक्रमाला सुरुवात केली. यावेळी जागतिक महिला दिन साजरा करणे मागचे हेतू व उद्देश याबाबत शैक्षणिक प्रकल्पातील मुलांचे मुलींचे जोरदार भाषणे व नृत्य व कथा गायन कार्यक्रम संपन्न झाला.

महिला दिन

यावेळी डॉक्टर सौ रंजनाताई बेल्हेकर यांचा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते यापूर्वी सत्कार ही झालेला आहे याबद्दलची आठवण काढण्यात आली. व तसेच त्यांचा सत्कार स्वाती वाघे मॅडम यांनी केला माननीय नीलिमा निचीत मॅडम, यांचाही सत्कार शालू श्रीफळ देऊन डॉक्टर सौ रंजनाताई बेल्हेकर मॅडम यांनी सत्कार केला.एक कर्तुत्वान स्त्री असा त्यांचा उल्लेख करण्यात आला. नारी शक्तीचा सन्मान आज करण्यात आला. यावेळी डॉक्टर रंजनाताई बेल्हेकर यांची अध्यक्षीय भाषण झाले त्यावेळी त्यांनी सर्व विद्यार्थिनींनी स्वतः आत्मनिर्भर होऊन शिक्षणात मोठी प्रगती करावी असा मौलिक विचार प्रदान केले.

महिला दिन

यावेळी कृषी महाविद्यालयातील शिक्षिका आरती वाघ मॅडम, प्रोफेसर गोरटे मॅडम, मुळे मॅडम. बी ए. एम एस कॉलेजच्या डॉक्टर तन्वी उगले, डॉक्टर स्नेहा ओहोळ, फार्मसी महाविद्यालयातील प्रोफेसर कर्जुले मॅडम, पुनम साळुंके मॅडम, स्वरा जावळे मॅडम,
बीएड कॉलेजमधील शिक्षिका मनीषा भोईटे मॅडम ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल व ज्ञानेश्वर इंटरनॅशनल स्कूल मधील शिक्षिका संगीता हापसे मॅडम,कविता पेटे मॅडम,मयुरी निपुंगे, यांचा सन्मान करण्यात आला यावेळी ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल व इंटरनॅशनल स्कूलचे व बी.ए.एम. एस. मधील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर इंटरनॅशनल स्कूलचे शिक्षक श्री अमोल विघे सर यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुरेशराव बेल्हेकर साहेब यांनी संस्थेतील सर्व महिला वर्गाला आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

महिला दिन

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

महिला दिन
महिला दिन

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

महिला दिन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!