मंदिरात भाविकांना सोयीसुविधांचा अभाव! अर्थिक उत्पन्नाचे स्रोञ असूनही भाविकांच्या सुविधेंकडे देवस्थानचे दुर्लक्ष! भाविक – भक्त देवस्थान समितीवर ना’राज’!
नेवासा – नेवासा शहरात असलेल्या आणि भारतातील भाविक – भक्तांची अपार श्रद्धा आणि निष्ठा असलेल्या येथील जगप्रसिद्ध एकमेव मोहिनीराज मंदीर हे असून येथील मंदिराचे बांधकाम अहिल्याबाई होळकर यांचे प्रधान सचिव असलेले राजे चंद्रचूड जहागीरदार यांनी करवून घेतलेले असल्याचे वास्तव असून या मंदिरातील प्रत्येक दगड हे नक्षीने कोरलेला तसेच विविध प्रकारच्या मूर्ती या मंदिरात दगडावर असून हे मंदिर पूरातन काळातील भारतातील एकमेव देखणे मंदिर अाहे माञ या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविक – भक्तांच्या सोयी – सुविधेंसाठी मंदिर विश्वस्त आणि पुजारी विश्वस्तांचे अक्षम्य दुर्लक्ष झालेले असून या देवस्थानचे अध्यक्षच केवळ ‘नामधारी’ बनल्यामुळे या पविञ मंदिरात विश्वस्तांपेक्षा दुसरीच मंडळी “बिनपगारी आणि फुल अधिकारी” झाल्यामुळे भाविक – भक्तांना सुविधा देण्याऐवजी विश्वस्त मंडळींपेक्षा दुसरेच आपला ‘पावर’ गाजवितांना दिसून येत असल्यामुळे देवस्थान कारभाराची चक्क वाट लागल्याचे भाविक – भक्तांतून बोलले जात अाहे त्यामुळे भाविक – भक्तांतून देवस्थान समितीवर संताप व्यक्त केला जात आहे.

समुद्रमंथनाच्यावेळी १४ रत्ने बाहेर आली त्यापैकी अमृत हे एक असून या अमृत वाटपाचे काम देवांनी विष्णूकडे सोपविलेले होते श्री विष्णूनी मोहिनीचे (अर्धनारीनटेश्वर) रूप घेऊन देव आणि दानव यांच्यात अमृत व मदिराचे वाटप केले देव आणि दानव यांना एकाच पंक्तीत समोरा – समोर बसून देवांना अमृताचे वाटप तर दानवांना सुरा म्हणजेच मदिरेचे वाटप केले गेले हे फक्त राहू व केतू या दानवांनाच लक्षात आले व ते देवांच्या पंक्तीत येऊन बसले आणि मोहिनीरूप घेतलेल्या विष्णूने त्यांना अमृत दिले परंतू त्यांनी अमृत पिताक्षणी ते विष्णूचे लक्षात आले व त्यांनी सुदर्शन चक्राने लगेच त्यांचे शीर छेदले गेले परंतू त्यांचे शीर अमर झाले आणि श्री विष्णूने मोहिनीरूप घेऊन अमृताचे वाटप केले

ते जगातील एकमेव ठिकाण म्हणजे नेवासा नगरी असून मोहिनीराजांचे येथे भव्यदिव्य आणि देखणे मंदिर असल्यामुळे भारतातून भाविक – भक्त येथे दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर येत असतांना आणि या देवस्थानकडे अर्थिक उत्पन्नाचे स्रोञ असतांनाही भाविकांच्या सोयी – सुविधांकडे देवस्थान समिती दुर्लक्ष करत असल्यामुळे या मंदिरात असलेल्या देवस्थान आणि पुजारी या दोन ट्रस्टवर भाविकांची प्रचंड नाराजीचा सुर निर्माण झालेला असून याकडे देवस्थान विश्वस्तांनी वेळीच लक्ष घालण्याची गरज असल्याचे भाविक – भक्तांतून बोलवे जात आहे.
मोहिनीराज मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविक – भक्तांना देवस्थान समितीकडून साधी वाहन पार्किंग, स्वच्छतागृह आणि पिण्याच्या पाणीची सुद्धा सुविधा मिळत नसून देवस्थान समितीची मोठी अर्थिक ‘कुवत’ असतांनाही भाविक – भक्तांकडे देवस्थान समिती अक्षम्य दुर्लक्ष करत असल्यामुळे या समितीला भाविक – भक्तांचेच काही देणे – घेणे नसल्याचे भक्तांतून बोलले जात असून या समितीमध्ये आता चक्क एकतर्फी कारभार सुरु असून समितीचे ‘अध्यक्ष’ हेच केवळ ‘नामधारी’ बनल्यामुळे विश्वस्तांपेक्षा इतरांचीच देवस्थानच्या कारभारात चलती निर्माण झाल्यामुळे भाविकांतून याबाबत तीव्र नाराजीचा सुर निर्माण झालेला असून देवस्थान समितीने याकडे लक्ष घालण्याची नितांत गरज बनली आहे.

जगप्रसिद्ध भारतातील एकमेव मोहिनीराज मंदिर नेवासा येथे असून या मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना साघे पिण्याचे पाणी सुद्धा मिळत नसल्यामुळे देवस्थान समिती नेमके करती तरी काय? असा परखड सवाल भाविक – भक्तांतून उपस्थित केला जात असून देवस्थान समितीवर भक्तांतून चिड व्यक्त केली जात आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.