ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
पोलीस

नेवासा – अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वाचा संवेदनशील असणारा तालुका नेवासा पोलीस स्टेशनला नुकतीच अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला यांनी आकस्मिक भेट दिली. यावेळी श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कल्लूबर्मे, शेवगाव उप विभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांचेसह संपूर्ण पोलीस कर्मचारी वर्ग हजर होता.

यावेळी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या 100 दिवसाच्या कालबद्ध कार्यक्रमाच्या संबंधाने केलेली तयारीच्या अनुषंगाने पोलीस स्टेशनची पाहणी केली.

पोलीस

पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी कर्मचारी यांची बैठक घेऊन प्रलंबित गुन्हे, हरवलेली माणसे, उघडकीस न आलेले चोरीचे गुन्हे, अवैध धंद्यावरती छापे घालणे सह विविध क्षेत्रातील गुन्हेगारीचा संपूर्ण आढावा घेऊन कामासंबंधी सूचना दिल्या.
नेवासा पोलीस स्टेशन हद्दीतील कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले परंतु आणखी सुधारणा करण्याबाबत अशा व्यक्त केली.
मागील महिन्यांमध्ये चोरी, घरफोडी, जबरी चोरी यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील, मनोज अहिरे, पोलीस हवालदार साठे, पोलीस कॉन्स्टेबल डमाळे, साळवे, तांबे यांचे प्रशस्तीपत्रक देऊन कौतुक केले. नंतर पोलीस अधीक्षक यांनी नवीन पोलीस स्टेशन व पोलिसांच्या निवासस्थान इमारतीची बांधकामाची पाहणी करून आर्किटेक्चर व ठेकेदार यांच्याकडून बांधकाम प्रगती बाबत माहिती घेतली.

पोलीस
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पोलीस
पोलीस

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पोलीस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!