नेवासा – चॅम्पियन ट्रॉफी मध्ये खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यामध्ये भारताने न्युझीलँडला चार विकेटने मात देऊन आपले विश्व विजेतेवर पुन्हा आपले नाव कोरले.रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळल्या गेलेल्या या सामन्यामध्ये भारताने रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या समवेत चौथ्यांदा ही ट्रॉफी जिंकण्यात यश मिळवले. या सामन्याचा खरा शिल्पकार ठरला तो भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, ज्याने संघाच्या विजयात मोलाची भूमिका निभावली, आणि आपले 58 वे अर्धशतक पूर्ण करताना 76 रन बनवले.

शुभमन गिल 31, अक्षर पटेल 29 ,के एल राहुल 34 ,आणि श्रेयस अय्यरणे मॅन ऑफ द सिरीजचा किताब फटकावला .50 ओव्हर मध्ये 252 रनचे लक्ष मिळालेल्या भारतीय संघाने नऊ चेंडू बाकी असताना आपले लक्ष पूर्ण केले फिलिप्स 34, मायकल ब्रेसवेल 53, रचीन रवींद्र 37, विल्यम्सम 15 आणि विल्यम्सन यांनी 11 राणाची खेळी केली. कुलदीप यादव याने दोन विकेट, रवींद्र जडेजा एक विकेट, मोहम्मद शमी एक विकेट,तर वरून चक्रवर्तीने दोन विकेट घेण्यात यश मिळवले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.