नेवासा – मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेड चे तालुका अध्यक्षपदी अँड सोनल वाखुरे यांची निवड व कार्यकारिणी ही जाहीर…
सविस्तर वृत्त असे की, महिला दिनानिमित्त पावन गणपती मंदिर नेवासा फाटा रोड येथे जिजाऊ ब्रिगेड चे वतीने उखाणे स्पर्धा, संगीत खुर्ची तसेच अँड स्मिता लवांडे व अँड मयूर वाखुरे यांचे कायदेविषयक मार्गदर्शन व बालकांचे व्याख्यानं सह विविध उपक्रम राबवून महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिजाऊ ब्रिगेड चे तालुका अध्यक्षपदी निवड झालेल्या कै अँड के एच वाखुरे यांची सून अँड सोनल मयूर वाखुरे यांचा सत्कार करून जिजाऊ ब्रिगेड चे जिल्हा अध्यक्ष नंदिनी सोनाळे व उपाध्यक्ष शारदा वांढेकर यांचे सूचनेनुसार कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

त्यानुसार जिजाऊ ब्रिगेड उपाध्यक्ष अँड स्मिता लवांडे, सचिव अँड रेणुका कोकाटे, कार्याध्यक्ष उज्वला मते, सहसचिव अँड रुपाली मते, कोषाध्यक्ष प्रियंका वाखुरे, संघटक कल्पना वरुडे, सहसंघटक अनिता मते, प्रसिध्दी प्रमुख छाया जगताप, सदस्य पदी कल्याणी कुटे, उज्वला शिंदे, रुपाली मते, वर्षा काळे, शुभांगी मुंगसे,कविता फाटके,ज्योती घाडगे तसेच
तालुका मार्गदर्शक म्हणून अँड सुरेखा टेमक, कल्पना मते यांची निवड करण्यात आली. निवडपदाचे पत्रक रावसाहेब घुमरे यांचे हस्ते देण्यात आले. सर्व जिजाऊ ब्रिगेड चे सदस्यांसह पदाधिकारी यांनी कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.