नेवासा – जमीन अथवा इतर व्यवहार करताना आधी साठेखत तयार केले जाते. त्यानंतर संबंधित व्यवहाराचे पैसे अदा केल्यानंतर खरेदी खत तयार होते. म्हणजेच पूरक दस्तावेज तयार करावे लागतात. यासाठी १०० रुपये मुद्रांक शुल्क भरावे लागायचे, त्यात वाढ करून ते ५०० रुपये करण्यात आले आहे. तर एखाद्या दस्तावर भरावयाच्या मुद्रांक शुल्काबाबत दस्त अभिनिर्णय प्रक्रियेसाठी सध्या आकारण्यात येणाऱ्या १०० रुपयांऐवजी १००० रुपये शुल्क करण्याचे अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आले आहे.

म्हणजेच एखाद्या करारासाठी किती मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे हे जाणून घेण्यासाठी जिल्हा सहनिबंधकाकडे अर्ज करताना आता १००० रुपये भरावे लागणार आहेत. बँकेकडून कर्ज घेताना जो करार होतो त्यासाठी मुद्रांक शुल्क भरावे लागते. मात्र त्याचा पुरावा कर्ज घेणाऱ्यांना मिळत नाही, त्यांच्याकडे आता हे मुद्रांक शुल्क भरल्याचा ऑनलाईन पुरावा उपलब्ध होणार आहे. त्यासाठी ई-मुद्रांक प्रमाणपत्राची नवीन तरतूद लागू करण्याची घोषणाही अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.