नेवासा – विमानतळाच्या विस्तार आणि विकासासाठी १,३६७ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असून त्या कामांना वेगाने सुरुवात झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना ही घोषणा केली. सन २०२१ मध्ये शिर्डी विमानतळाला प्रमुख विमानतळाचा दर्जा मिळाला होता.

आता विमानतळाच्या सुविधांमध्ये आणखी सुधारणा करत लवकरच नाईट लँडिंग सुविधाही सुरू केली जाणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली. शिर्डी हे धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण असल्याने या विमानतळाच्या विकासामुळे भाविक आणि पर्यटकांसाठी प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे. विस्तारित सुविधांमुळे देशभरातील प्रवाशांसाठी हे विमानतळ अधिक कार्यक्षम आणि सुटसुटीत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.