नेवासा – नेवासा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये शनिवारी – एक हजार रुपयांची घसरण झाल्यानंतर काल सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी आणखी १०० रुपयांची घसरण होवून जास्तीत जास्त भाव १५०० रुपयांपर्यंत निघाले.अचानक २६०० रुपयांवरुन १५०० रुपयांपर्यंत कांदा भाव कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

घोडेगाव कांदा मार्केटमध्ये नवीन उन्हाळी कांद्याची आवक अपवादानेच होत आहे. अद्यापही आवक होणारा कांदा, हा लाल कांदाच आहे. काल एक नंबरच्या कांद्याला १४०० ते १५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. दोन नंबरला १३०० ते १४०० रुपये, तीन नंबरच्या कांद्याला १२०० ते १३०० रुपये भाव मिळाला. गोल्टा कांद्याला १००० ते १३०० रुपये, गोल्टी कांद्याला ८०० ते १००० रुपये तर जोड, हलक्या व डॅमेज कांद्याला ३००. ते ८०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळाला. अपवादात्मक भाव १६०० ते १७०० रुपये प्रतिक्विंटल पर्यंत निघाला.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.