सोनई – राष्ट्रीय जनता दल पार्टीचे राज्य बिहार मतदारसंघ महुआ विधानसभा आमदार श्री मुकेश कुमार रौशन शनि दरबारी यांनी आपल्या कुटूंबातील सदस्यांसह शनी शिंगणापूरात येऊन शनी देवांचे दर्शन घेतले या वेळी शिवसेनेचे युवा नेते प्रकाश भाऊ शेटे व सामाजिक कार्यकर्ते संतोष तेलोरे फोटोग्राफर यांनी देवस्थान अतिथीगृहात त्यांचा सन्मान केला व शनिदेवाची व देवस्थान परिसरातील विकास कामे राबविण्यात असलेल्या उपक्रमाची माहिती दिली. या वेळी दोन तीन वर्षां पुर्वी आपण येथे आलो होतो शनि देवाची महत्त्व आपण ऐकुन होतो शनिशिंगणापूर हे मुलखा वेगळे गाव असुन येथील घराला दरवाजे नाहीत हे विशेष आहे, तसेच या ठिकाणी चोरी सुद्धा होत नाही, देशातील हे पहिलेच गाव असावे येथील परिसर पाहुन येथे पुन्हा पुन्हा यावे, असे वाटते देवस्थान मार्फत राबविण्यात असलेल्या योजनांची माहिती तेलोरे यांनी त्यांना दिली.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.