नेवासा – बीड जिल्ह्यातील मारहाणीच्या गुन्ह्यांतील आरोपी सतीश उर्फ खोक्या भोसले हा सहा दिवसांपासून फरार होता. या खोक्याला प्रयागराज येथून अटक करण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील एका व्यक्तीला शिरूरकासार तालुक्यातील बावी येथे आणून ५ ते ६ जणांनी अर्धनग्न करून बॅटने मारहाण केली होती. यात पोलिसांनी स्वतः तक्रार देऊन गुन्हा दाखल केला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी दिलीप ढाकणे व महेश ढाकणे या बापलेकाला मारहाण केल्याचाही व्हिडिओ व्हायरल झाला. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले होते.

मात्र, तो ६ दिवसांपासून सापडलेला नाही तर हाच फरार खोक्या टीव्ही चॅनेलवर लाईव्ह मुलाखत देत आहे. यामुळे पोलीस करतात काय ? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मग पोलिसांनी आपली सूत्रे फिरवण्यास सुरूवात केली. महाराष्ट्रात आपल्याला अटक होऊ शकते, हे खोक्याच्या लक्षात आले. त्यामुळे खोक्या बस पकडून तातडीने प्रयागराजला निघाला. प्रयागराजला आपल्याला कुणी पकडू शकत नाहीत, याची खात्री खोक्याला झाली असावी. त्यानंतर प्रयागराजमधून खोक्या निघण्याच्या तयारीत होता. तेव्हांच पोलिसांनी प्रयागराज विमानतळावर खोक्याला अटक केली आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.