नेवासा – राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील सहायक प्राध्यापकांची ४ हजार ४३५ रिक्त पदे भरतीसाठी प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवण्यात आला – आहे. त्यावर वित्त विभागाने उपस्थित केलेल्या त्रुटींची पूर्तता करून लवकरच भरतीला गती देण्यात येईल, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी विधान परिषदेत एका लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.

विधान परिषद सदस्य जयंत आसगावकर यांनी प्राध्यापकांच्या रिक्त जागा तात्काळ भरण्याबाबत लक्षवेधी
सूचना मांडली होती. यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना पाटील यांनी, शिक्षण क्षेत्रातील भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी राज्यपालांनी यावर स्थगिती देऊन बदल सूचवले होते. आता राज्यपालांनी ही.. स्थगिती उठविल्यामुळे छाननी करून पारदर्शकपणे भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे, असे पाटील यांनी सांगितले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.