सोनई – जैनपूर ग्रामपंचायतच्या सरपंच सौ शैला किशोर शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखालील सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालय जैनपूर येथे बैठक पार पडली या बैठकीत सौ. सविता सुरूसे यांनी उपसरपंच पदासाठी श्री संदिप डिके यांच्या नावाची सुचना मांडली त्याला सर्व सन्माननीय सदस्यांनी अनुमोदन दिले यावेळेस ग्रामपंचायत सदस्य कानिफनाथ डिके, संध्या डिके,ताराबाई गव्हाणे,सविता बर्डे,हिराबाई डिके,अर्जुन शिरसाठ, शिवाजी गिते, सविता सुरूसे

तसेच सामाजिक कार्यकर्ते किशोर शिरसाठ, सदाशिव डिके,शरद डिके,तंटामुक्ती उपाध्यक्ष दादासाहेब तागड संदिप सुरूसे,किरण डिके अमोल डिके,रविभाऊ डिके,बाळासाहेब डिके,नारायण डिके तसेच ग्रामसेविका कावेरी चांधोरे इ उपस्थित होते. भविष्यात गावाच्या प्रत्येक घटकाचा विकास करून शक्य तेव्हढी रचनात्मक कामे करून संघटनेने टाकलेली जबाबदारी ही संधी समजून सर्वांना सोबत घेवून माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली गावाच्या विकासासाठी काम करू असे उपसरपंच संदीप डिके म्हणाले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.