महाराष्ट्रातील नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत 221 नेवासा विधानसभा मतदारसंघात प्रसिद्धीप्रमुख श्री आदिनाथ रावसाहेब पटारे यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून उत्कृष्ट आणि चांगल्या प्रकारचे प्रचार यंत्रणा सांभाळल्याबद्दल व केंद्राचे व राज्याच्या विविध योजना गोर गरीब घटकापर्यंत पोहोचवण्याचं उल्लेखनीय काम केल्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे सोशल मीडियाचे प्रदेश संयोजक माननीय श्री प्रकाशजी गाडे यांनी त्यांना पत्र पाठवून आपल्या कामगिरीबद्दल शाबासकी दिली.

हे यश प्रत्येक हिंदुत्ववादी कार्यकर्त्याच्या अथक परिश्रमाचा आणि संघर्षाचा परिणाम आहे येणाऱ्या काळात आपण आणखी मेहनत करून आपल्या सरकारची कामे नागरिकापर्यंत पोहोचवण्याचे व विरोधकांची खोटे मुद्दे खोडून काढण्याचे कार्य करणार आहोतच भाजप महायुतीच्या विजयाच्या जल्लोष तर असलाच पाहिजे परंतु त्याचबरोबर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये हीच विजयाची मालिका अखंडितपणे ठेवण्यासाठी आपले कार्य निरंतर आणि अधिक जोमाने सुरू ठेवण्यासाठी सांगितले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. प्रदेश कार्यालयाकडून झालेल्या गौरव निमित्त तालुक्यातील महायुतीच्या सर्व कार्यकर्त्याकडून श्री आदिनाथ रावसाहेब पटारे यांचे अभिनंदन व शुभेच्छा देण्यात येत आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.