नेवासा – सध्या नेवासा शहरातील नागरिकांना कर पट्टी च्या पावत्या नगरपंचायत मार्फत दिल्या जात आहे,नेवासा नगरपंचायतची बाकी खूप आहे पण ती वसूल न होण्या मागचे मुख्य कारण म्हणजे शास्ती कर,हा शास्ती कर म्हणजे सावकारकी पेक्षा जास्त आहे, वार्षिक 24% म्हणजे 3 वर्षात बाकीची रक्कम डबल होते व ही रक्कम जास्त झाल्यामुळे नागरिक कर भरत नाही,तरी नगरपंचायत 2017 ला झाली व त्या नंतर शास्ती कर लागू झाला तरी जेव्हा पासून शास्ती लागू झाला त्या आधीच्या रकमेवर शास्ती कर लावण्यात येऊ नये
तसेच सर्व रक्कम एकाच वेळेस भरणाऱ्या नागरिकांनाही शास्ती कर मध्ये सुट मिळावी,जेणेकरून नगरपंचायतची वसुली पण जास्त होईल व सुविधा पण देता येतील कारण नगरपंचायत सुविधा पण देत नसल्यामुळे पण नागरिक कर भरत नाही,तरी शास्ती कर रद्द करावा अश्या मागणीचे निवेदन नेवासा नगरपंचायतच्या मुख्याधिकारी सोनाली म्हात्रे यांना आंतरराष्ट्रीय मानवधिकार आयोगाचे तालुकाध्यक्ष स्वप्नील मापारी यांनी दिले.यावेळी सचिन कदम,दिपक धोत्रे,आरिफ शेख व रावसाहेब तागड आदी उपस्थित होते…
हा जाचक शास्ती कर रद्द करावा जेणेकरून करवसुली पण होईल व नगरपंचायत मार्फत नागरिकांना सुविधा देण्यात येईल.. – स्वप्नील राजेंद्र मापारी,युवानेते नेवासा
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा : ७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.