पदाधिकारी व कर्मचारी यांच्यातचं अवमेळ, त्रास मात्र गावाला…
भालगाव – केंद्रशासन व राज्यशासन विवीध कल्याणकारी योजना सर्वसामान्य जनतेसाठी राबवित आहे.केंद्राची हर घर जल योजना नेवासा तालुक्यातील भालगाव ग्रामस्थांना शाप की वरदान ठरणार? हि शंका उपस्थीत होत आहे. भालगाव ग्रामसभेचे आयोजन दिनांक २/१/२०२५ रोजी सकाळी १०वाजता आयोजन करण्यात आले असल्याचे ग्रामस्थरावरील माध्यमांवर सांगीतले असले तरी ११ वाजेपर्यंत ग्रामपचायत कार्यालयाला मात्र टाळेचं होते. वेळेचे महत्व अधिकार्यांना नाही का ? काही ग्रामस्थ ठरलेल्या वेळेत पदाधिकारी व कर्मचारी उपस्थीत नल्यामुळे अनुपस्थीत राहिले.

ग्रामसभा ग्रामस्थांसाठी असते का? ग्रामपंचायत स्थरावरील अधिकारी व कर्मचारी यांचे वाद यैकण्यासाठी झाली हा संशोधनाचा विषय ठरला आहे. पदाधीकार्यांचेंच जर कर्मचारी यैकत नसल्याचे सरपंच सांगतात तर ग्रामस्थांनी प्रश्न सांगायचे कुणाला?
पदाधिकारी व कर्मचारी यांच्यातच अरेरावीची भाषा झाल्यामुळे ग्रामस्थांना आपले प्रश्न उपस्थीत करण्यास हेवा वाटला. त्यातच बहुतांशी सदस्यच गैरहजर होते तर ग्रामसभाच कशाला? हा ही नविनच प्रश्न उपस्थीत होत आहे. तेरा गाव पाणी योजना तसेच जिल्हा परीषद व ग्रामपंचायतचा संयुक्त निधीतुन भालगाव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त निधीतुन गावासाठी स्वतंत्र पाइपलाईन करण्यात आली आसली तरी पदाधिकारी व कर्मचारी यांच्यातील मतभेदामुळे गाव मात्र पाण्यापासुन वंचीत असल्याचे चित्र ग्रामसभेत दिसले आहे.

ग्रामस्थांना पाणी वेळेवर मिळावे हिच प्रामाणीक अपेक्षा ग्रामस्थाची होती तरी यांच्या रहाड्यात पाण्याचा प्रश्न बाजुलाच राहीला. गोदावरीच बँक वाँटरच पाणी जर उशाला असले तरी घरात पाणी नसल्याची खंत ग्रामस्थांना असल्याचे चित्र मात्र ग्रामस्थांना दिसले आहे. ग्रामपंचायतने पाण्याचे नियोजन करण्याची गरज असल्याचे ग्रामस्थांची इच्छा आहे. जलजीवन पाणी योजनेचे काम भालगावात सुरु असताना गावातील एका भागाच्या हद्दीतील पाईपलाईन फुटल्यामुळे पुर्ण गावाात पाणी बंद आहे. जलजीवन योजनेच्या ठेकेदाराला तिन दिवसापासुन सांगुनही फुटलेल्या पाईपचे लिकेज न काढल्यामुळे तीन दिवसापासुन पाणी संपुर्ण न मिळाल्यामुळे ग्रामस्थ हैरान आहे. संबंधीत ठेकेदाराने लवकर पाईपलाईन दुरुस्थ करुन ग्रामस्थांची पाण्याची समस्या दुर करावी अशी मागणी सर्व ग्रामस्थांनी केली आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.