ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
कृषि

नेवासा – भारतीय कृषि अनुसंधान परिषद, अटारी, झोन-८, पुणे यांचे वतीने केव्हीके बाभळेश्वर येथे आयोजित शेतकरी परिसंवाद कार्यक्रमात कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने येथील अधिकारी तसेच कार्यक्षेत्रातील प्रगतशील शेतकरी यांनी सहभाग घेतला. सदर कार्यक्रम मा. श्री. शिवराज सिंह चौहान, कृषि आणि शेतकरी कल्याण व ग्रामविकास मंत्री, भारत सरकार, नवी दिल्ली, मा.ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री, महाराष्ट्र राज्य, डॉ. सुब्रोतो रॉय, संचालक, आय.सी.ए.आर.-अटारी, झोन -८, पुणे, डॉ. प्रशांतकुमार पाटील, कुलगुरू, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, श्री. सिद्धाराम सालीमठ, जिल्हाधिकारी, अहमदनगर व श्री. आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अहमदनगर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

कृषि

सदर कार्यक्रमाची सुरुवात कृषि प्रदर्शनाचे उद्घाटन करून झाली. यावेळी मा. श्री. शिवराज सिंह चौहान, डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील, व डॉ. सुब्रोतो रॉय यांनी कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने च्या प्रदर्शन स्टॉल ला भेट दिली. कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. श्यामसुंदर कौशिक यांनी केव्हीके मार्फत प्रसारित केल्या जाणाऱ्या पिक आधारित शेती तंत्रज्ञान, पशुपालनातील आधुनिक तंत्रज्ञान, कृषि यांत्रिकीकरण तसेच केव्हीके दहिगाव-ने द्वारा निर्मित जैविक शेती निविष्ठा इत्यादी विषयी पाहुण्यांना अवगत केले; मान्यवरांनी कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने करत असलेल्या कामाची स्तुती केली.

कृषि

कार्यक्रमात कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव ने चे यशस्वी शेतकरी श्री. नवनाथ लक्ष्मण उकिर्डे, साकेगाव, तालुका पाथर्डी यांना कृषि ड्रोन फवारणी उद्योजकतेसाठी तर यशस्वी शेतकरी श्री. मोहन गंगाधर तुवर, पाचेगाव, तालुका नेवासा यांना सेंद्रिय गुळ निर्मिती उद्योगासाठी केंद्रीय कृषिमंत्री मा.शिवराज सिंह चौहान यांचे हस्ते प्रशस्तीपत्र, सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने च्या वतीने सर्व शास्त्रज्ञ व कर्मचारी तसेच ५० हून अधिक प्रगतशील शेतकऱ्यांनी या कार्यक्रमात व कृषि प्रदर्शनात सहभाग घेतला.

कृषि

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

कृषि
कृषि
कृषि

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

कृषि

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!