नेवासा – ३ जानेवारी २०२५ रोजी सिद्धेश्वर इंग्लिश स्कूल,प्रवरासंगम शाळेत “क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची १९३ वी जयंती” उत्साहात साजरी करण्यात आली. या विशेष प्रसंगी अध्यक्षा म्हणून इंग्रजी विषय अध्यापिका सौ.वैशाली राऊत यांनी सावित्रीबाईंच्या कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाईंच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून झाली. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.बाबासाहेब गायकवाड यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले आणि कार्यक्रमाच्या उद्दिष्टांवर प्रकाश टाकला.

विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ.रेखा पठारे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर अनुमोदन श्री.भाऊसाहेब चाबुकस्वार यांनी दिले. याप्रसंगी श्री.साहेबराव तमनर,श्री.विष्णू पोटे,श्री.गणेश देवतरसे,श्री.राजीव पवार,श्री.प्रदीप दहातोंडे,श्री.विजय कडाळे,श्री.सुहास धामणे,श्री निलेश सोनवणे,सौ.प्राजक्ता रासने,सौ.साळवे मॅडम, सौ.आगळे मॅडम,पंडूरे मॅडम मंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी शिक्षक – शिक्षकेत्तर वर्ग आणि विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.रेखा पठारे मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.सुहास धामणे यांनी केले. सावित्रीबाईंच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी असा कार्यक्रम प्रेरणादायी ठरल्याचे उपस्थितांनी सांगितले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.