नेवासा – डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा अमेरिकेची सूत्रे हाती घेतल्यानंतर अनेक निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या नागरिकांना मायदेशी पाठवण्याच्या निर्णयाचाही’ समावेश आहे. दरम्यान, अमेरिकेने बुधवारी त्यांच्या देशात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या १०४ भारतीय नागरिकांना मायदेशी पाठवले होते. आता ते अशा पद्धतीने अमेरिकेत राहणाऱ्या आणखी ४८७ भारतीयांना माघारी पाठवणार आहेत. याबाबत केंद्र सरकारच्या वतीने शुक्रवारी माहिती देण्यात आली आहे. पत्रकार परिषदेत या प्रकरणावर बोलताना परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले की, अमेरिकेने केंद्र सरकारला त्यांच्या देशात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या ४८७ भारतीय नागरिकांची माहिती दिली असून, त्यांच्या हद्दपारीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.