कुकाणा – कुकाणा येथील स्व. अरुणनाना गोपीनाथ कावरे पाटील बहुउद्देशीय शैक्षणिक संचलित संस्था
श्री गणेशा पब्लिक स्कुल चे वार्षिक स्नेहसंमेलन व विविध सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. चिमुकल्यांच्या या कलेला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी शिक्षक शिवाजीराव कानडे यांनी केले . कार्यक्रमासाठी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष अंकुशराव काळे,यांनी कार्यक्रमाला भेट देत शुभेच्छा दिल्या तर सरपंच लता अभंग, शिवसेना युवा नेते सोमनाथ कचरे , ग्रामपंचायत सदस्य रज्जाक इनामदार,भानुदास कावरे, संस्थेचे खजिनदार डॉ. पांडुरंग भूमकर,पांडुरंग कावरे, मछिंद्र कावरे, किरण कावरे,नामदेव उंडे मोहनराव गरड, संजय कावरे,व्यासपीठावर उपस्थित होते.

या वेळी शिवाजीराव कानडे यांनी मनोगत व्यक्त करत मार्गदर्शन केले संस्थेच्या वतीने मान्यवरांचे सत्कार करण्यात आले या प्रसंगी राजेंद्र गरड, अरुण गरड, संकेत खराडे,
आदिसह माता पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने
उपस्थित ,होते.
या वेळी चिमुकल्यानी देशभक्तीपर गीत, व महाराष्ट्राची अस्सल मराठी लावणी,गवळणी, नृत्य सादर करून उपस्थितांची वाहवा मिळाली.
तसेच ,संतोषी शेंडे,कावरे अश्विनी,रासकर सुष्मा या शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी मोलाचे सहकार्य केले.

प्रसंगी अबॅकस क्लास चे संचालक केकान व सौ अंजली केकन यांच्या कडे श्री गणेशा पब्लिक स्कूल विद्यार्थी क्लास करत आहेत त्यात गुणवत्ता मिळवलेल्या विद्यार्थ्यांनी यशसंपादन केलेल्या मधे यश अशोक चौधरी याने दुसऱ्या गटातून मध्ये 100 पैकी 100 मार्क मिळवले तसेच पूर्वी अण्णासाहेब कावरे येणेदेखील उत्कृष्ट पारितोषिक मिळवले या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पार पडला
कार्यक्रमाचे प्रास्तविक प्राचार्य सौ.वर्षां कावरे यांनी केले सूत्रसंचालन प्रा. राजेंद्र केकन तर आभार संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब कावरे यांनी मानले ,


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.