नेवासा – तालुक्यातील सौंदाळा ग्रामपंचायतने केलेल्या ग्रामसभा ठराव प्रमाणे शिव्या बंदी व विधवा महीला सन्मान बाबतीत शासन निर्णय जारी करून माता-भगिनीचा जागतिक महीला दिनी सन्मान करावा या मागणीसाठीचे सरपंच शरद आरगडे यांचे अमरण उपोषण ४ दिवसा नंतर आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आलेले आहे
सौंदाळा ग्रामपंचायतीचे सरपंच शरद आरगडे यांनी दि.८ मार्च रोजी सकाळी ११ वाजे पासून गावातील सिद्धेश्वर मंदिराच्या सभामंडपात बेमुदत उपोषण सूरु केले आहे ते चौथ्या दिवशी मागे घेतले आहे

सौंदाळा ग्रामपंचायतीने ग्रामसभेत शिव्या बंदी व विधवा महिला सन्मान बाबत ठराव घेऊन मंजूर केले आहेत. ज्या स्त्रीच्या उदरात नऊ महिने राहून आपण जन्म घेतो त्या पवित्र देहाला शिव्या देऊन अर्वाच भाषेत बोलून आपण अपमानित करतो. वास्तविक भांडण झाल्यावर मोठ्याने आरडून ओरडून शिव्या देत असताना तिथे माता-भगिनींचा काही संबंध नसतो परंतु तमाम महिलांना तेथे अपमानित केली जाते. तसेच शिव्यांचे रूपांतर मोठ्या वादात होऊन पोलीस स्टेशन कोर्टा पर्यंत हे प्रकरण जाते. त्यामुळे वेळ पैसा व मानसिक त्रास सहन करावा लागतो म्हणून सौंदाळा ग्रामपंचायतने शिव्या बंदीचा ठराव करून माता-भगिनींचा सन्मान केला आहे. शिव्या देणाऱ्या व्यक्तीस ५०० रुपये दंड आकारण्यात येतो त्यामुळे शिव्या देणे थांबले आहे.

तसेच पतीच्या निधन होण्यामध्ये स्त्रीचा कुठलाही दोष नसतो परंतु तिचे कुंकू पुसणे, जोडवे काढण्यापासून सुरुवात होते ते तिला धार्मिक किंवा कौटुंबिक लग्न समारंभात सहभागी केले जात नाही. तिला पांढऱ्या पायाची उपमा देऊन अपमानित केले जाते, परंतु पतीच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी कुटुंब प्रमुख गेला म्हणून तिच्यावर येते. तिला समाजाने धीर देणं गरजेचं असतं. विधवा महिलेवर मुलांच्या शिक्षणाची, कुटुंब खर्चाची, वृद्ध सासू-सासर्यांच्या औषध उपचारांच्या खर्चाची जबाबदारी येते. अशावेळी तिला विधवा म्हणून समाज तिच्याकडे अबला कुंमकुवत नजरेने बघतो. काही विधवांचे अतिशय लहान मूल असतात. त्यांना बापाच्या सावलीची व तिला पतीची गरज असते. अशावेळी तिला जर पती गेल्यानंतर पुनर्विवाहस परवानगी दिली तर कुटुंब पुन्हा व्यवस्थित होऊन जीवन आनंदी होऊ शकते. म्हणून सौंदाळा गावाने विधवा प्रथा बंद करून विधवांना धार्मिक व कौटुंबिक तसेच लग्न समारंभात सहभागी होण्याची परवानगी देऊन त्यांना कुंकू- टिकली, सौंदर्य प्रसादानाची दाग-दागिने, मंगळसूत्र घालण्यास सांगून विधवा पुनर्विवाह परवानगी दिली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सर्व लाडक्या बहिणींचा शिव्या बंदी विधवा सन्मान कायदा करून त्यांना चांगले जीवन जगता यावे यासाठी वरील प्रमाणे महिलांच्या सन्मानार्थ शासन निर्णय जारी करावा अन्यथा जागतिक महिला दिन शनिवार दि. ८ मार्च २०२५ रोजी सकाळी ११ वाजता महिला दिनी सौंदाळा ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करू असे निवेदन मुख्यमंत्री व प्रशासनाला दिले होते, मात्र त्याची दखल न घेतल्याने श्री.आरगडे यांनी सौंदाळा येथील सिद्धेश्वर मंदिराच्या सभामंडपात आमरण उपोषण सूरु केले होते आज ४ दिवसा नंतर आमदार विठ्ठलराव लंघे यांनी महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना भेटून याबाबत चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे सांगितले तसेच गटविकास अधिकारी संजय लखवाल यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करून अहिल्यादनगर जिल्ह्यामध्ये शिवी बंदीचा ठराव घेण्या संदर्भात जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतला सूचना देण्याची असलेली मागणी कळविलेली आहे असे सांगितले.

यावेळी सरपंच संघटनेचे मार्गदर्शन दिनकररावजी गरजे आणि निमगाव चे सरपंच भिवाजी आगाव कौठा सरपंच प्रमोद गजभार वंजारवाडी सरपंच महादेव दराडे भेंडा बुद्रुक सरपंच नामदेव निकम भेंडा खुर्द सरपंच वैभव नवले नजीक चिंचोली सरपंच वनमाला चावरे सुरेश नगरचे सरपंच कल्याण उभेदळ, फत्तेपुर चे सरपंच बाबाभाई शेख सौंदळा गावचे बाळासाहेब आरगडे सचिन आरगडे गणेश आरगडे मधुकर आरगडे दिगंबर आरगडे भिवसेन गरड विशाल बोधक भाऊसाहेब आरगडे चंद्रकांत आरगडे मारुती आरगडे ज्ञानदेव चामुटे कृष्णा चामुटे दत्तू चामुटे कोमल आरगडे श्रद्धा आरगडे मंगल बोधक उषा बोधक संगीता बोधक पुष्पा आरगडे मीरा आरगडे नंदा आढागळे कावेरी आडगळे राणी आरगडे अलका आरगडे रेखा आरगडे कांता आरगडे अर्चना आरगडे मंगल बोधक ज्योती बोधक संगीता आढागळे सुमन आढागळे आदी मोठया सख्खेने हजर होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.