नेवासा – केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने मंगळवारी भारतीय कुस्ती महासंघावरील निलंबनाची कारवाई मागे घेतल्याचे जाहीर करत आदेश काढला आहे. यामुळे भारतीय कुस्ती महासंघाला आता देशांतर्गत कुस्ती स्पर्धांचे आयोजन करणे आणि आंतरराष्ट्रीय – स्पर्धांसाठी राष्ट्रीय संघांची निवड करण्याचा मार्ग मोकळा झाला – आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयाचे स्वागत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष आमदार संग्राम जगताप यांनी करून राज्यातील सर्व पदाधिकारी आणि भारतीय कुस्ती महासंघातील पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयाचे स्वागत करताना आ. जगताप म्हणाले, कुस्तीगिरांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत कुस्तीची कोणती संघटना अधिकृत आहे हा विषय पूर्णतः मिटला आहे.

या निर्णयाचा कुस्तीगिरांना खूप फायदा होईल, आता कुस्तीपटू राष्ट्रीय स्पर्धेसाठी चाचण्या देऊ शकतील, तर संलग्न राज्य व जिल्हा संघटना कुस्तीगिरांच्या वेगवेगळ्या पातळीवर निवड चाचण्या घेऊन निवडलेला संघ पुढील राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी पाठवू शकेल. जिल्हा कुस्तीगीर संघाचे सचिव प्रा. डॉ. संतोष भुजबळ म्हणले, भारतीय कुस्ती महासंघाचे २४ डिसेंबर २०२३ ला निलंबित करण्यात होते, त्यामुळे पूर्ण देशातील कुस्ती क्षेत्रात मोठ्याप्रमाणात नाराजी पसरली होती. मात्र आत संघटनेचे निलंबन मागे घेण्यात आले आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने आपल्या आदेशात म्हटले की, भारतीय कुस्ती महासंघाने त्यांच्या कामकाजात योग्य सुधारणा केली आहे, म्हणून संघटनेचे निलंबन उठवण्याचा निर्णय घेण्यात आला. या महत्त्वपूर्ण निर्णयाचा देशातील व राज्यातील कुस्तीगिरांना खूप फायदा होईल.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.