नेवासा – १३ वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन २२ आणि २३ मार्च रोजी शिर्डी येथे होणार आहे. या संमेलनात परिसंवाद, कीर्तन, भारुड, अभंगवाणी असे विविध कार्यक्रम आयोजित केले जातील. पहिल्या दिवशी भव्य दिंडी सोहळा स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अखिल भारतीय मराठी संत साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी दिली.
महाराष्ट्रातील संत, शूर आणि विरांच्या भूमीत ११ नोव्हेंबर २०११ रोजी वारकरी साहित्य परिषदेची स्थापना झाली. या संस्थेमार्फत अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते. महाराष्ट्रातील संत आणि समाजसुधारकांच्या विचारांचा प्रसार करणे आणि समाजाला योग्य दिशा देणे हा या संमेलनाचा मुख्य उद्देश आहे.

या संमेलनात वारकरी संप्रदाय, महानुभव पंथ, नाथ संप्रदाय, रामदासी संप्रदाय यांसारख्या विविध क्षेत्रांतील मराठी संतांच्या साहित्यावर चर्चासत्रे आणि विचारमंथन होईल. समाजाला योग्य दिशा देण्यासाठी हे संमेलन एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. या चळवळीचे उद्दिष्ट साध्य करण्याच्यादृष्टीने दरवर्षी महाराष्ट्रातील एका जिल्ह्यात अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन आयोजित केले जाते. या संमेलनात सहभागी होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी वारकरी साहित्य परिषदेशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.