गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूर येथील पोलीस ठाण्यात तपासावरील आरोपीस पोलीसांनी ताब्यात घेतले.
याबाबत पोलीस सुत्रांकडून समजलेल्या माहिती नुसार दि. ११ जुन २०२३ रोजी गुन्हा र नं. ११५/२०२३ मध्ये आरोपी किरण मंगेश पवार रा. कुंदेवाडी ता. निफाड जि. नाशिक हा पोलीसांच्या हातावर तुरी देऊन फरार होता. तो गुन्हा घडल्या पासुन मिळुन येत नव्हता.

शनिशिंगणापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके यांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधिकारी वैभव कलुबर्मे, सुनील पाटील शेवगाव पोलीस उप अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार श्री भागवत,पोलीस हेड कॉन्स्टेबल गुलाब मोकाटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल महादेव घाडगे, पोलीस हेड कॉन्स्टेबल बालाजी मुसळे, पोलीस काॅस्टेबल अजय ठुबे, पोलीस काॅस्टेबल साईनाथ सुपारे,महीला पोलीस ऋषाली गर्जे यांचे एक पथक तयार करून काही तांत्रिक व मानवी कौशल्याच्या आधारे मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सदर घटनेतील आरोपी हा गावात आलेला आहे. त्यानुसार पोलीस पथकाने त्यास सापळा रचुन दि. २ रोजी पहाटे ५.३० वाजता ताब्यात घेतले. पुढील अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके हे करत आहेत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.