पानेगावात हरीनाम सप्ताह आ. लंघे यांची उपस्थिती.
सोनई | संदीप दरंदले – हनुमान मंदिर, पानेगाव येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ व अखंड हरिनाम सप्ताह सोहळा काल्याचे कीर्तन ह.भ.प.भगवानजी महाराज जंगले (शास्त्रीजी) यांच्या वाणीतून सेवा पार पडली.यावेळी जंगले शास्त्री महाराज म्हणाले भगवंताचे नामस्मरण केले तर माणसाचे जिवन सुखमय होते. जीवनात सुख शांती समाधाम नामचिंतन केल्याने मिळते.आठ दिवस चाललेल्या सप्ताहचा काल्याचे कीर्तन होऊन महाप्रसाद सोहळा संपन्न झाला.

याप्रसंगी नेवासाचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी उपस्थित राहून कीर्तन सेवेचा लाभ घेतला. यावेळी भाजप किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष अंकुश काळे पाटील, पानेगाव सरपंच संजय जंगले, शिरेगावचे सरपंच किरण जाधव, अर्जुन जंगले, सतिश जंगले, डॉ.जयवंत गुडघे,विजय जंगले,बबनराव जंगले, दत्तू पाटील घोलप आणि संत महंत भाविक भक्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.