नेवासा – अस्थिर वातावरण असताना देखील संकोच प्रमुख कंपन्यांच्या समभागांची चांगली खरेदी झाल्याने मरगळ झटकली गेली. परिणामी, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी परतली. सेन्सेक्स ३६८ पेक्षा जास्त अंकांच्या वाढीसह बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी निर्देशांकाने देखील २३,७०० अंकांची पातळी ओलांडली.
दोन दिवसांच्या घसरणीला ब्रेक लावत सेन्सेक्स वर्ष २०२५ च्या पहिल्या दिवशी ३६८.४० अंकांनी वाढून ७८,५०७.४१ अंकांच्या पातळीवर बंद झाला. दिवसभरात सेन्सेक्सने ६१७.४८ अंकांची उसळी घेतली होती. निफ्टीदेखील ९८.१० अंकांच्या वाढीसह २३,७४२.९० अंकांच्या पातळीवर बंद झाला. स्मॉलकॅप निर्देशांक १.०३ टक्क्यांनी, तर मिडकॅप निर्देशांक ०.५० टक्क्यांनी वधारला.

घाऊक विक्रीमध्ये चांगली वाढ झाल्यामुळे मारुतीच्या समभाग किमतीमध्ये सर्वाधिक ३.२६ टक्के वाढ नोंदवली. त्यापाठोपाठ महिंद्रा अँड महिंद्रा, लार्सन अँड टुब्रो, बजाज फायनान्स, टाटा मोटर्स, इंडसइंड बँक, एशियन पेंट्स, पॉवर ग्रीड, एचडीएफसी बँक आणि अॅक्सिस बँक या समभागांना खरेदीचा चांगला
पाठिंबा मिळाला. टाटा स्टील, अदानी पोर्ट्स, एचसीएल टेक, स्टेट बँक ऑफ इंडिया, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि टेक महिंद्रा या समभागांची घसरण झाली.

वर्षाच्या पहिल्या दिवशी शेअर बाजाराने सुमारे अर्धा टक्के वाढ नोंदवली. सुरुवातीच्या घसरणीनंतर विविध क्षेत्रातील प्रमुख कंपन्यांच्या निवडक समभागांमध्ये खरेदी दिसून आली. त्यामुळे बाजार तोट्यावर मात करत नफ्यावर पोहोचला, असे रेलिगेअर ब्रोकिंग लिचे वरिष्ठ संशोधन उपाध्यक्ष अजित मिश्रा म्हणाले. मासिक आधारावर पायाभूत सुविधांच्या आकडेवारीमध्ये सुधारणा होत असल्याने आणि चालू आर्थिक वर्षाच्या उर्वरित कालावधीत भांडवली खर्चात वाढ अपेक्षित असल्याने भांडवली वस्तू, उद्योग, वाहन आणि ऊर्जा या समभागांना पाठिंबा मिळाला, असे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले.
दरम्यान, मावळत्या वर्षात शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या संपत्तीत २०२४ मध्ये ७७.६६ लाख कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. मागील वर्षात सेन्सेक्सने ८ टक्क्यांच्या वाढीची नोंद केली. ८ टक्क्यांहून अधिक वाढला. नवीन वर्षाच्या पहिल्या सत्रात बुधवारी रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ८५.६४ वर स्थिरावला.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.