पाचेगाव – नेवासा तालुक्यातील पुंनतगाव येथे गावाचे सरपंच सुदर्शन वाकचौरे यांच्या संकल्पनेतून गेल्या पाच वर्षा पासुन शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने ध्वनिप्रदूषण न करता जयंती काळात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या विधिवत पूजाअर्चा करून नांमकित कीर्तनकार आणून भक्तिभावाने गावातील नागरिक कीर्तनाचा आनंद घेतात.
गेल्या पाच वर्षांपासून डीजेवर बंदी घालून नीवन उपक्रम राबविण्यात येत असल्याने गावा बरोबर परिसरातून या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे.या जयंतीनिमित्त बीड येथील एकनाथ महाराज गाडे यांचे कीर्तन झाले.त्यांनी आपल्या कीर्तनात शिवाजी महाराजांचा इतिहास समोर बसलेल्या मावल्याना सांगितला.

प्रत्येक वर्षी जयंतीनिमित्त नवीन संकल्प ठेऊन नवीन उपक्रम राबविण्यात येवे. फक्त महाराजांची जयंती साजरी न करता त्यांचे विचार आचरण आत्मसात करावे असे ह त्यांनी आपली कीर्तनातून सांगितले. यापुढे जयंतीनिमित्ताने गोरगरीब मुलाचे शिक्षण व लग्नामध्ये आर्थिक मदत केल्याने खर्याअर्थाने महाराजांची जयंती उत्सव साजरा होईल. त्यामुळे आपण आज ही महाराजांची प्रजा आहे.शिवाजी महाराजांना मुळे आपण शिवभक्त तयार झालो.एकनाथ गाडे व सरपंच सुदर्शन वाकचौरे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या निमित्ताने योगी दिपकनाथ महाराज,हरी महाराज वाकचौरे,आदर्श ग्रामपंचायत अधिकारी सतीश मोटे,पोलीस पाटील संजय वाकचौरे,विठ्ठल पवार,तंटामुक्ती अध्यक्ष हिरालाल वाघमारे,नामदेव पवार,आशपक देशमुख,बाळासाहेब तागड,विलास वाकचौरे,अनिल वाकचौरे, राजू शिंदे,भैरव वाघमारे,ऍड बाबासाहेब वाघमारे,अशोक वाकचौरे,रमेश होळकर,बापूसाहेब लांडगे,वसीम शेख आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.