ताज्या बातम्या

44476+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

क्रिकेट

नेवासा – सुपा-पारनेर औद्योगिक वसाहतीची श्रीलंका क्रिकेट टीमचा यशस्वी फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन याला भुरळ पडली आहे. यामुळेच याठिकाणी किक्रेटपटू मुथय्या कंपनी उभारणार आहे. येत्या एप्रिल महिन्यात या प्रकल्पाच्या उभारणीस प्रारंभ होणार असल्याची माहिती औद्योगिक विकास महामंडळाच्या सुत्रांनी दिली.

या प्रकल्पासाठी १ हजार ६३५ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. याठिकाणी – विविध शितपेयांसाठी लागणाऱ्या कॅनची निर्मिती होणार आहे. श्रीलंकेच्या क्रिकेट टीममधून निवृत्ती घेतल्यानंतर मुथय्या मुरलीधरन याने सिलोन बेव्हरेजेस या उद्योग समुहाची उभारणी केलेली आहे. आता या उद्योग समुहाचा विस्तार करण्यासाठी मुथय्याने थेट सुप्याच्या एमआयडीसीमध्ये एंट्री करण्याचा निर्णय घेतला आहे. या उद्योगासाठी ३५ एकर जमिनीची मागणी करण्यात आली असून त्यातून ४५५ तरुणांना रोजगाराची निर्मिती होणार आहे. औद्योगिक विकास महामंडळाकडे मुथय्या मुरलीधरन याच्या कंपनीकडून जागेचा प्रस्ताव सादर झाल्यानंतर मायनर मॉडीफीकेशन कमिटीच्या बैठकीत भूखंड वितरणाबाबत चर्चा करण्यात आली.

क्रिकेट

या कमिटीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर राज्याचे उद्योग मंत्रालय पुढील प्रक्रिया पार पाडून येत्या एप्रिल महिन्यापासून या उद्योगाच्या बांधकामाला परवानगी देणार असल्याचे उपप्रादेशिक अधिकारी डी. आर. काकडे यांनी सांगितले. सिलोन बेव्हरेजेसची दरवर्षी ३०० दशलक्ष पेय कॅन तयार करण्याची तसेच ते भरून देण्याची क्षमता आहे. सुपा- पारनेर औद्योगिक वसाहतीच्या म्हसणे फाटा विस्तारीतं वसाहतीमध्ये २०१८ मध्ये कॅरिअर मायडिया या कंपनीच्या माध्यमातून बड्या कंपनीची. मुहूर्तमेढ झाली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कंपनीचे भुमिपूजन केलें होते. त्यानंतरच्या आठ वर्षात या विस्तारीत वसाहतीमध्ये ३३ उद्योग सुरू झाले. सरत्या वर्षाअखेर या वसाहतीमध्ये ५ हजार १८६ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली. त्यातून १० हजार ५८४ तरुणांना रोजगार मिळाला. सिलोने बेव्हरेजेसच्या माध्यमातून तब्बल १ हजार ६३५ कोटी रुपयांची गुंतवणूक असणारा सर्वाधिक मोठा प्रकल्प या वसाहतीमध्ये उभारला जाणार आहे. कॅरिअर मायडिया या कंपनीने या वसाहतीमध्ये ८०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

क्रिकेट
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

क्रिकेट
क्रिकेट
क्रिकेट

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

क्रिकेट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Join Our Whatsapp Group
Whatsapp वर अपडेट मिळवा