नेवासा – नेवासा बुद्रुक येथील युवा नेते तुषार गायकवाड यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेवासे शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
सदरील निवड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशान्वये व उत्तर जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
गायकवाड यांच्या निवडीचे पत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष रविंद्र पिंपळे यांच्या हस्ते नेवासे येथील पक्ष कार्यालयात दि.२८ रोजी देण्यात आले.

यावेळी गायकवाड म्हणाले की मा. राजसाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेल्या महाराष्ट्राच्या हिताचे लोकउपयोगी कार्य या पदाच्या माध्यमातून करण्याचे प्रयत्न मी करेल व गोरगरीब जनतेचे विविध प्रश्न शासन दरबारी मांडून पदाच्या माध्यमातून न्याय देण्यासाठी कटिबद्ध राहिल तसेच पक्ष बांधणी व पक्षसंघटन वाढीसाठी प्रयत्न करेल.
गायकवाड यांच्या निवडीचे सर्वच स्थारतुंन अभिनंदन करण्यात येत आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.