नेवासा | श्री नाथाभाऊ शिंदे पाटील – तालुक्यातील शेत रस्ता व शिव रस्ता समस्याग्रस्त शेतकऱ्यांना स्वतः साठी न्याय हक्काचा रस्ता मिळून देण्यासाठी व अतिक्रमण मुक्त करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शेत व शिव पानंद चळवळ ही श्री शरद राव पवळे चळवळीचे प्रणेते व अध्यक्ष आणि श्री दादासाहेब जंगले पाटील राज्य समन्वयक व महाराष्ट्र राज्य शेत व शिवपानंद रस्ता चळवळीचे उपाध्यक्ष नाथाभाऊ शिंदे यांनी सुरू केलेल्या नेवासा तालुक्यामध्ये महिन्याच्या पहिल्या गुरुवारी व तिसऱ्या गुरुवारी तहसील कार्यालयामध्ये जनन्याय दिन आयोजित केला जातो.

नुकताच दिनांक 3 एप्रिल 2025 रोजी या जनन्याय दिना मधून नेवासा तहसील कार्यालयाचे तहसीलदार डॉक्टर संजय बिरादार, नायब तहसीलदार श्री चांगदेव बोरुडे, नायब तहसीलदार श्री संदीप चिंतामणी साहेब रोजगार हमी योजना अव्वल कारकून श्री शिरीष डी कुलकर्णी लिपिक श्री उमाप यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले व प्रत्यक्ष प्रकरणे हाताळली 143 व ५/२ ही रस्ता प्रकरणे नेवासा तालुक्यात पेंडिंग राहणार नाहीत याची दक्षता घेतली जाईल असे यावेळी डॉक्टर संजय बिरादार यांनी सांगितले त्यामुळे उपस्थित शेतकऱ्यांमध्ये प्रकरणे लवकर मार्गी लागतील अशी आशा निर्माण झाली. कार्यालयातील लिपिक श्री श्रीपती उमाप यांनी महाराष्ट्र राज्य शेत व शिवपालन चळवळ समिती जनन्याय दिन चा फलक तहसील कार्यालय मध्ये लावला.

यावेळी गेल्या मार्च महिन्यात नेवासा तालुक्यातील , शिव रस्ता हद्दी खुणा निश्चित करून दिल्या, पोलीस ठाणे नेवासा यांच्याकडून शिवरस्ताहद्दी खुणा व रस्ता खुला करण्यासाठी विनाशुल्क मोफत पोलीस बंदोबस्त उपलब्ध केला. परंतु काही ठिकाणी रस्ते खुले करण्याचे काम अपूर्ण असल्याबद्दल चर्चा करून मंडळ अधिकारी प्रश्न सोडवतील असे तहसीलदारांनी सांगितले. सर्व समस्याग्रस्त शेतकऱ्यांनी डाक बंगला शासकीय विश्रामगृह नेवासा मधून मीटिंग आयोजित करून तहसील कार्यालयात जनन्याय साठी प्रवेश केला. या जनन्यायदिनातून उप अधीक्षक भूमी अभिलेख श्री संदीप गोसावी साहेब यांनी प्रत्येक महिन्याला तीन शिवरस्ते विनाशुल्क व मोफत खुले करून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नाचा आढावा घेतला या जन न्याय दिनाचे वेळी महाराष्ट्र राज्य शेत व शिवपानंद चळवळीचे उपाध्यक्ष श्री नाथाभाऊ शिंदे पाटील, पत्रकार कारभारी गरड, प्रशांत निंबाळकर, रमेश भक्त, तुकाराम कोलते, संदीप आरगडे, अशोक लांडगे,पाराजी गुडदे श्री अशोकराव गागरे श्री ज्ञानेश्वर जंगले श्री राजू गरड,

सगाजी ऐनर,श्री सागर सोनटक्के, भगवान पटेकर, बाळासाहेब थोरात विठ्ठल करमड. हरिभाऊ तुवर, मनोहर मतकर, गोरक्षनाथ शिंदे, संभाजी पवार, प्रवीण पवार, श्री जानकु रुपनर,साहेबराव आखाडे श्री गोरक्षनाथ कातोरे, श्री संदीप उर्फ भाऊराव नारायण कुऱ्हे, श्री संभाजी बाबुराव कुऱ्हे रावसाहेब भोगे आसाराम राशिनकरश्री संतोष भाऊसाहेब शिंदे कुशाबा फुलसौंदर सोमनाथ माकोणे,रामभाऊ पवार, मुरलीधर जरे, कानिफनाथ कदम, संजय गागरे, बापू मोहन लोंढे संभाजी मुरकुटे, संजय भानुदास शेलार,चांगदेव आरगडे व तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते पुढील जन्यादिन एप्रिल 25 च्या तिसऱ्या गुरुवारी म्हणजे 17 एप्रिल 25 रोजी होईल असे तहसीलदार डॉक्टर संजय बिरादार यांनी जाहीर केले जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या जनन्याय दिनाचा लाभ घ्यावा असेही आवाहन केले.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.