नेवासा – महंत सुनिलगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीराम साधना आश्रमात भव्य श्रीराम जन्म सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भावगीते व भक्तिगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रा.देविदास साळुंके व आशुतोष पुंड यांच्या गायनाने सुमारे दोन तास श्रोते मंत्रमुग्ध झाले. उघड दार देवा, हीच अमुची प्रार्थना, या पंढरपुरात काय वाजत गाजत, माझे माहेर पंढरी, अंबाबाई लाड लाड ये गं, यमुनेच्या तिरी या भक्तिगीतांनी वातावरण भक्तिमय करून टाकले.

कर चले हम फिदा, संदेसे आते है या देशभक्तीपर गीतांनी सैनिकांना मानवंदना देण्यात आली. या जन्मावर या जगण्यावर, जिंदगी के सफर में, जिंदगी कैसी हे पहेली या गाण्यांनी जीवनाचे तत्त्वज्ञान उलगडून सांगितले. ही मायभूमी ही जन्मभूमी, जय जय महाराष्ट्र माझा या महाराष्ट्र गीतांनी वातावरण भारावून गेले. छावा चित्रपटातील संवादांनी श्रोत्यांच्या डोळ्यांत अश्रू आले. अवध में राम आए हैं या गीताने कार्यक्रमाचा समारोप झाला. दिलावर शेख, रमेश कारले आणि सनी गायकवाड यांनी उत्तम वाद्यवृंदसाथ केली.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.