नेवासा : वीज वितरण थकीत वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या वायरमनला शिवीगाळ,लाथाबुक्यांनी व बँटने मारहाण करत जीवे ठार मारण्याची धमकी देत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी अंबादास पोपट लोखंडे (रा.नेवासा खुर्द) यांच्या विरुद्ध नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी लहू राम गरगडे (वायरमन) रा.चेडेचांदगाव ता शेवगाव (हल्ली मु.मुकींदपुर ता नेवासा) यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले आहे की नेवासा शहरालगत असलेले पावण गणपती, अहिल्यानगर परीसरात थकबाकी वसुलीसाठी वायरमन गरगडे हे आहे.

दि.१ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० च्या दरम्यान गरगडे व एन.सी. सी एजन्सीचे कामगार राजेंद्र पठाडे हे थकीत लाईट बील वसुली करीता पावण गणपती मंदीरा जवळील पावण अॅक्वा या दुकानात विज बील वसुली करीता गेले असता दुकानाचे मालक अंबादास पोपट लोखंडे यांनी थकीत विज बीलापोटी १८ हजार तीनशे रुपयांचा धनादेश खात्यात रक्कम नसल्याने रद्द झाला असून थकीत बील भरा असे लोखंडे यांना वायरमन गरगडे हे समजावुन सांगत असताना लोखंडे हे शिवीगाळ करु लागले यावेळी लोखंडे यांना समजावून सांगत असताना लोखंडे यांनी वायरमन गरगडे यांना खाली पाडुन लाथाबुक्यांनी तसेच हातातील लाकडी बॅट गरगडे यांच्या डोक्यात व पायावर मारली. व तुला कुठे जायचे तिथं जाय मी कुणाला घाबरत नाही असे म्हणत माझ्या दारात आला तर तुला जिवे ठार मारील अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.