नेवासा – शिर्डीमध्ये ग्रामस्थांनी ज्या पद्धतीने वाढत्या गुन्हेगारीचा प्रश्न उपस्थित केला होता त्यावर प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. आठवड्याभरात चांगल्या पद्धतीने कारवाई झाली आहे. मात्र कालची जी घटना घडली ती व्यक्तिगत वादातून झाली आहे. एकाच समाजातील दोन परिवारातील हा वाद होता. शिर्डी शहरात जिल्हा पोलीस प्रमुखांनी आठ लोकांचं स्वतंत्र पथक तयार केलं आहे. हे पथक स्थानिक गुन्हे शाखेच्या नियंत्रणात काम करणार आहे. शिर्डीत जेवढे गुन्हेगार असतील त्यांच्यावर किती गुन्हे आहेत?

त्यांची चौकशी करणे, कुठलाही तडीपार व्यक्ती शिर्डीत नसेल याची खातरजमा करणे, यासाठी हे पथक कार्यरत राहणार असल्याची माहिती माजी खा.डॉ सुजय -विखे यांनी शिर्डीत दिली:–शिर्डीत बुधवारी सायंकाळी शिर्डी ग्रामस्थांनी शासकीय विश्रामगृहावर आयोजित केलेल्या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना डॉ सुजय विखे पाटील यांनी सांगितले की, रात्री अकरा वाजता साईबाबांची आरती संपल्यानंतर शिर्डी पूर्णपणे बंद राहील याची पुढील चार दिवस शहरातून दवंडी देण्यात येणार आहे. रात्री साडेअकरा वाजता शिर्डी शहरात कोणीही व्यक्ती रस्त्यावर चालताना दिसला तर त्याला विचारणा करूनच अटक करण्यात येईल.

त्या व्यक्तीला दवाखाना किंवा अत्यावश्यक ठिकाणी जाण्याचा पुरावा.. द्यावा लागेल. हे करणे काळाची गरज आहे. कोणीही व्यक्ती कारण नसतांना रात्री उशिरा रस्त्यावर फिरते. असे अनेक निर्णय कालच्या बैठकीत घेण्यात आले आहे. याचा परिणाम पुढील दहा दिवसांत आपल्याला शिर्डी शहरात पहावयास मिळणार आहे.पोलिसांच्या कारवाईला वेग आला आहे. रात्री साडेअकरा वाजता हॉटेल बंदचा निर्णय हा ग्रामसभेत झाला आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.